'धुरंधर'च्या शूटिंगवेळेस कलाकारांनी केलेलं खास फोटोशूट, अक्षय खन्नाच्या स्वॅग पाहून थक्कच व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:09 IST2025-12-19T13:57:09+5:302025-12-19T14:09:26+5:30
'धुरंधर'च्या शूटिंगच्या खास सीनच्या वेळेस कलाकारांनी खास फोटोशूट केलं. या फोटोशूटच्या वेळेसही अक्षय खन्नाचा रुबाब लक्ष वेधून घेतोय

'धुरंधर' सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाची भूमिका चांगलीच गाजत आहे

'धुरंधर'मध्ये हमजा आणि यालिना यांचं लग्न होतं. तेव्हा मुख्य कलाकारांनी खास फोटोशूट केलं होतं. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

'धुरंधर' गाजवलेल्या अक्षय खन्नाचा फोटोशूटमध्येही रुबाब पाहायला मिळतोय. अक्षय खन्नाच्या डोळ्यातील आर्त भाव आणि स्वॅग सर्वांचं लक्ष वेधून घेतोय

'धुरंधर'मध्ये रणवीर सिंगने खास पेहराव केला होता. याशिवाय डोक्यावर आकर्षक फेटा बांधलेला पाहायला मिळत आहे.

याशिवाय याच सिनेमातील अभिनेत्री सारा अर्जुनने 'धुरंधर'साठी नवरीचा खास लूक केला होता. सारा खूप सुंदर दिसत आहे.

'धुरंधर'मध्ये २६/११ चा कट घडवून आणणारा ISI दहशतवादी भूमिकेत अर्जुन रामपाल दिसला. अर्जुनने सुद्धा खास फोटोशूट केलेलं दिसलं

एकूणच 'धुरंधर' सिनेमातील कलाकारांच्या पडद्यामागेही खास अदा पाहायला मिळाल्या. 'धुरंधर' सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केलाय

















