२१ वर्षांमध्ये इतकी बदलली 'धडकन'फेम महिमा चौधरी; आता दिसते आधीपेक्षा जास्त सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:42 PM2022-02-25T12:42:47+5:302022-02-25T12:45:36+5:30

Mahima chaudhary: 'दिल है तुम्हारा', 'ओम जय जगदीश', 'तेरे नाम', 'बागबान' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

'धडकन', 'परदेस', 'लज्जा', 'LOC कारगील' अशा किती तरी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी.

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.

महिमाने आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, धडकन चित्रपटातील तिची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.

'धडकन'मध्ये महिमाने शीतल ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या लूकचीही प्रचंड चर्चा झाली होती.

धडकन या चित्रपटाला जवळपास २१ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून केला आहे. विशेष म्हणजे या २१ वर्षात महिमामध्ये कमालीचा बदल झाला आहे.

महिमा आता पूर्वीपेक्षा जास्त ग्लॅमरस दिसू लागली आहे. महिमा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.

महिमाचं खरं नाव ऋतू चौधरी आहे. परंतु, कलाविश्वात येण्यापूर्वी तिने तिचं नाव बदललं.

'दिल है तुम्हारा', 'ओम जय जगदीश', 'तेरे नाम', 'बागबान' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.