प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी! १-२ नव्हे ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार 'हे' बहुचर्चित सिनेमे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:21 IST2025-07-29T19:13:08+5:302025-07-29T19:21:09+5:30
येत्या ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित असलेले बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ऑगस्ट महिना हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. जवळपास आठ चित्रपट या महिन्यात रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कॉंटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

सन ऑफ सरदार-२
'सन ऑफ सरदार' या चित्रपटाचा पहिला भाग हिट ठरला. त्यानंतर आता १३ वर्षानंतर या सन ऑफ सरदारचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
'अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी'
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आधारित 'अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी' हा चित्रपट ‘द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या शंतनू गुप्ता लिखित पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
धडक-२
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'धडक-२' बद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. हा रोमकॉम चित्रपट देखील १ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
'हीर एक्सप्रेस' एक कॉमेडी चित्रपट आहे. उमेश शुक्ला यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. १ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यामध्ये आशुतोष राणा, गुलशन ग्रोवर आणि संजय मिश्रा अशी स्टारकास्ट आहे.
वॉर-२
सध्या देशभरात 'वॉर २' या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात दोन वेगवेगळ्या इंडस्ट्रीतील सुपरस्टार एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर २' हा चित्रपट १४ ऑगस्ट २०१५ रोजीप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
परम सुंदरी
परम सुंदरी सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचा 'परम सुंदरी' सिनेमा २९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर आला होता. '२ स्टेट्स' सारखीच याही सिनेमाचं कहाणी आहे. जान्हवी आणि सिद्धार्थ ही फ्रेश जोडी पडद्यावर येणार असल्याने चाहतेही उत्सुक आहेत.
कुली
सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एक जबरदस्त अॅक्शन अवतारात प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाले आहेत. रजनीकांत यांचा कुली हा एका सुपरहिट सिनेमा येत आहे. या प्रोमोमध्ये रजनीकांतसोबत नागार्जुन अक्किनेनी, उपेंद्र राव, सौबिन शाहिर आणि सत्यराज यांची झलक देखील दिसते. लोकेश कनगराज दिग्दर्शित हा चित्रपट १४ ऑगस्ट २०१५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.