पहिल्यांदाच पापाराझींसमोर आली रणवीर-दीपिका पादुकोणची लेक 'दुआ', पार्टीतील फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 10:33 IST2024-12-24T15:29:59+5:302024-12-25T10:33:22+5:30

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी पापाराझींना पहिल्यांदाच त्यांच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे. काही महिन्यांपूर्वीच दीपिका-रणवीर आईबाबा झाले आहेत.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या सहा वर्षांनी त्यांच्या आयुष्यात ८ सप्टेंबर रोजी लेकीचं (Daughter) आगमन झालं.

दीपिका-रणवीरने लेकीचं नाव 'दुआ' (Dua) असं ठेवलं आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या मुलीचं नाव आणि पहिली झलक शेअर केली होती. "आमच्या प्रार्थनेचं उत्तर म्हणजे आमची लेक आहे, त्यामुळं आम्ही तिचं नाव 'दुआ' असं ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं.

'दुआ'चा जन्म झाला तेव्हा दीपिका-रणवीरने लेकीच्या चेहरा न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांच्या चाहत्यांना मात्र 'दुआ' चा चेहरा पाहण्याची उत्सुता आहे. तिची झलक कधी दाखवणार याकडेही चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. आता नुकतंच काही खास लोकांना मात्र 'दुआ' चा चेहरा पाहण्याची संधी मिळाली.

दीपिका-रणवीर यांनी पापाराझींसाठी (२३ डिसेंबरला) खास एक पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये त्यांनी लाडक्या लेकीचा चेहरा पापाराझींना (Deepika And Ranveer Reveals Daughter Dua Face To Paparazzi) दाखवला. या पार्टीत फक्त पापाराझी आणि फोटोग्राफर्स उपस्थित होते.

या जोडप्यानेही आपल्या बाळाचे फोटो न काढण्याची विनंती पापाराझींना केली आहे. योग्य वेळ आल्यावर लेकीचा चेहरा दाखवला जाईल असा विश्वास त्यांनी पापाराझींना दिला आहे. त्यामुळे चाहत्यांना 'दुआ'चा चेहरा पाहण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पापाराझींसाठी आयोजित केलेल्या या खास पार्टीत दीपिकाने बेज रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. तर रणवीर सिंहने पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट घातला होता. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पण, 'दुआ' ही रणवीर आणि दीपिका यांच्यापैकी कुणासारखी दिसते, याचा मात्र खुलासा झालाय. ज्या पापाराझींनी पार्टीत हजेरी लावली होती. त्यापैकी एका फोटोग्राफरने झी न्यूजशी बोलताना सांगितलं की, 'दुआ' ही दीपिकाची कार्बन कॉपी आहे. "आम्ही तिला भेटलो तेव्हा दुआ झोपेलली होती. पण मी तुम्हाला सांगतो, ती तिची आई दीपिकाची एकदम कार्बन कॉपी आहे. अर्थात लहान मुले जसजसे वाढतात तसतसा चेहऱ्यातही बदल होते. पण, सध्या ती हुबेहुब तिच्या आईसारखी दिसते (Dua Looks Exactly Like Deepika Padukone)".

दीपिकाने सध्या मातृत्वाचा आनंद घेतेय. मुलीच्या संगोपनासाठी पुर्ण वेळ देत आहे. लेकीला जन्म दिल्यानंतर दीपिका हिने स्वतःचं इन्स्टाग्राम बायो देखील बदललं… फीड.बर्प.स्लीप.रिपीट… असं अभिनेत्रीने लिहिलं आहे.

आगामी काळात दीपिका ही रणबीर कपूरसोबत एका सिनेमात झळकणार आहे. सिनेमाई टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण संजय लीला भन्सालींंच्या आगामी 'लव एँड वॉर' सिनेमात खास भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर हा लवकरच 'डॉन ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.