'दंगल'मधील छोटी बबिता फोगाट झालीये आता मोठी; तिचं सौंदर्य पाहून व्हाल घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:19 IST2022-03-30T14:13:48+5:302022-03-30T14:19:57+5:30
Dangal child actress:सुहानीमध्ये आता कमालीचा फरक झाला आहे आणि आता ती पूर्वीपेक्षा जास्त छान दिसते.

२०१६ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'दंगल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घातला होता.
या चित्रपटात अभिनेता आमिर खान याने मुख्य भूमिका साकारली होती.
'म्हारी छोरियाँ छोरोंसे कम हैं के?' असा सवाल विचारत या चित्रपटातून गीता आणि बबिता फोगाट यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला होता.
या चित्रपटात एकूण चार अभिनेत्री झळकल्या होत्या. यात दोघींनी गीता-बबिताच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तर, दोघींनी त्यांच्या तारुण्यावस्थेतील.
या चित्रपटातील बबिता फोगाटच्या बालपणीची भूमिका साकारणारी सुहानी भटनागर साऱ्यांच्याच लक्षात असेल.
आपल्या अभिनयातून सुहानीने बबिताची भूमिका लोकप्रिय केली होती. मात्र, या चित्रपटानंतर ती फारशी कुठेही दिसली नाही. त्यामुळे सध्या ही अभिनेत्री काय करते? कशी दिसते? त्यावर प्रकाश टाकूयात.
सुहानी कलाविश्वात फारशी सक्रीय नसली तरीदेखील ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
सुहानीमध्ये आता कमालीचा फरक झाला आहे आणि आता ती पूर्वीपेक्षा जास्त छान दिसते.
सुहानीने छोट्या पडद्यावरील जाहिरातींपासून करिअरची सुरुवात केली होती.