'आखिरी पास्ता' ची हटके लव्हस्टोरी! मोबाईलच्या बिलाचा खर्च वाचवण्यासाठी भावनाला केलं प्रपोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 11:02 IST2023-09-26T10:43:12+5:302023-09-26T11:02:27+5:30
चंकी पांडे खऱ्या आयुष्यातही विनोदीच आहे.

अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. सुरुवातीला मुख्य अभिनेता आणि नंतर सहाय्यक अभिनेता म्हणून त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्याची 'आखिरी पास्ता' ही भूमिका खूपच गाजली.
आज चंकी पांडे आणि भावना पांडे यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. भावनाशी लग्न करण्याआधी ते बराच काळ एकमेकांना डेट करत होते. चंकीची एक फ्लाईट मिस झाल्याने खरंतर या दोघांची भेट झाली.
चंकी पांडे मिस इंडियाच्या प्रिलिमिनरी राऊंडचा जज होता. ते झाल्यानंतर चंकी मुंबईत परत येत होता मात्र त्याची फ्लाईट चुकली. यानंतर त्याने डिस्कोथेक धुंधरुमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
चंकी तिथे पोहोचला तेव्हा भावना आधीच तिच्या मित्रांसोबत तिथे होती. चंकीचं भावनाकडे लक्ष गेलं आणि त्याला असं वाटलं की आपण हिला आधी कुठेतरी पाहिलं आहे. नंतर त्याने भावनाचा नंबर मिळवला. नंतर जेव्हा तो पुन्हा दिल्लीला आला तेव्हा त्याने त्या नंबरवर फोन केला. मात्र तोवर भावना परदेशात शिकण्यासाठी गेली होती.
काही काळानंतर चंकीला एका कॉमन फ्रेंडकडून कळलं की भावना मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबली आहे. हे कळताच चंकीने भावना आणि तिच्या मित्रांसोबत हँगआऊट केले. 'तिरछी टोपीवाले' सिनेमाच्या सेटवर त्यांची पहिली डेट होती.
भावना शूटिंग बघण्यासाठी मित्रांसोबत सिनेमाच्या सेटवर आली होती. तेव्हा चंकीने भावनाला प्रभावित करण्यासाठी भावाची बीएमडब्ल्यू मागून तिला आणि मित्रांना ड्राईव्हवर नेले होते.
चंकीने खूपच मजेदार अंदाजात भावना प्रपोज केले होते. तेव्हा दोघंही तासनतास एकमेकांशी फोनवर गप्पा मारायचे. तेव्हा फोन कॉल्ससाठी खूप पैसे लागायचे.
एकदा चंकी म्हणाला की आपलं नातं आात खूपच महाग होत चाललंय. चल मग आता खर्च कमी करुया आणि लग्न करुन एकाच शहरात राहुया. चंकीचं हे प्रपोजल ऐकून भावनाही हो म्हणाली. नंतर दोघंही लग्नबंधनात अडकले.
काही वर्षांनी भावनाने अनन्या आणि रायसा या मुलींना जन्म दिला. त्यांची मुलगी अनन्या सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री आणि लोकप्रिय स्टारकिड आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या तिच्या आणि आदित्य रॉय कपूरच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु आहेत.