...अन् शिव-शंभूंचा काळ पुन्हा जिवंत झाला! 'छावा'च्या सेटवरील इनसाईड फोटो पाहून थक्क व्हाल

By देवेंद्र जाधव | Updated: March 3, 2025 17:13 IST2025-03-03T16:10:45+5:302025-03-03T17:13:08+5:30

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाच्या सेटवरील फोटो समोर आलेत. सेट उभारताना किती सखोल काम केलंय, या फोटोंमधून पाहायला मिळतं (chhaava)

'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिकची कमाई केलीय.

'छावा' सिनेमाच्या सेटवरचे इनसाईड फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये छत्रपती शिवरायांचा महाल हुबेहूब तयार करण्यात आलाय.

छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमहालात दरबार भरायचा. ती जागा 'छावा' सिनेमात उभारण्यात आलीय.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन तयार करण्यासाठी 'छावा' सिनेमाच्या संपूर्ण टीमने खूप कष्ट घेतले.

छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्या काळातला दरबार जिवंत वाटेल, इतकं त्यावर सखोल काम करण्यात आलंय. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट अत्यंत बारकाईने तयार करण्यात आली आहे.

'छावा' सिनेमात छत्रपती शंभूराजे जेव्हा सिंहासनावर विराजमान होतात तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवरायांचा जिरेटोप आणि पादत्राणे ठेवलेली दिसतात. 'छावा'च्या संपूर्ण टीमने थोरल्या महाराजांचा मान आणि आदर या स्मृतीतून जपलेला दिसतो.

'छावा'मधील राजदरबाराच्या भिंती, सिंहासन, मंत्र्यांसाठी असलेली आसनं अशा गोष्टींवर खूप कष्ट घेण्यात आले आहेत. यासाठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि कलादिग्दर्शकाचं कौतुक करावं तितकं कमीच