करोना काळात देवदूत ठरलेल्या सोनू सूदचं नेटवर्थ किती माहितीये? अजूनही मदतीचा ओघ आहे कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:49 AM2022-07-31T11:49:24+5:302022-07-31T11:55:11+5:30

Sonu sood: मुंबईतील अंधेरी येथे सोनूचं आलिशान घर आहे. यात चार बेडरुम, हॉल, किचन, गेस्ट रुम यांचा समावेश आहे.

सोनू सूद हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. करोना काळात सोनूने अनेक गरजुंना मदत केली.

पडद्यावर खलनायक ठरलेला सोनू खऱ्या आयुष्यात अनेकांसाठी हिरो ठरला. त्यामुळे आज तो जनसामान्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला आहे.

करोनाचं संकट उलटून बरेच दिवस झाले आहेत. मात्र, तरीदेखील सोनू सूदने केलेल्या मदतीचा ओघ अद्यापही कायम आहे. आजही अनेक जण त्याच्याकडे विविध गोष्टींसाठी आर्थिक मदत मागतात.

सातत्याने गरजुंना मदत करणाऱ्या सोनूची एकूण संपत्ती किती असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे त्याची संपत्ती किती ते जाणून घेऊयात.

सोनू सूद आज लक्झरी लाइफस्टाइल जगत असून त्याच्या संपत्तीमध्ये आलिशान बंगल्यांपासून लक्झरी कारपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोनू एका चित्रपटासाठी जवळपास २ कोटी रुपये मानधन घेतो.

सोनूकडे मर्सिडीज बेंझ एमएल क्लास, ऑडी क्यू ७ आणि पोर्शे या गाड्या आहेत. तसंच त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये अजून इतरही गाड्या आहेत.

सोनू चित्रपटांव्यतिरिक्त जाहिरातींच्या माध्यमातूनही पैसे कमावतो.

२०१६ मध्ये त्याने शक्तीसागर हे त्याचं प्रोडक्शन हाऊस सुरु केलं. या प्रोडक्शन हाऊसमध्ये त्याने १ कोटी ७० लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचं सांगण्यात येतं.

मुंबईतील अंधेरी येथे सोनूचं आलिशान घर आहे. यात चार बेडरुम, हॉल, किचन, गेस्ट रुम यांचा समावेश आहे.

सोनूकडे मर्सिडीज बेंझ एमएल क्लास, ऑडी क्यू ७ आणि पोर्शे या गाड्या आहेत. तसंच त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये अजून इतरही गाड्या आहेत.

आजच्या घडीला सोनूची एकूण संपत्ती १३० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.