ऐकावं ते नवलंच! कान्समध्ये सोनं आणि हिऱ्याने मढवलेली बिकिनी बॅग घेऊन पोहोचली उर्वशी रौतेला, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:02 IST2025-05-23T11:50:16+5:302025-05-23T12:02:12+5:30
उर्वशीच्या लूकपेक्षा चर्चेचा विषय ठरली ती अभिनेत्रीने घेतलेली बिकिनी बॅग.

७८व्या कान्स फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. अनेक भारतीय सेलिब्रिटीही कान्समध्ये हजेरी लावत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानेदेखील कान्स फेस्टिव्हलला हजेरी लावली. याचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
डिझायनर ड्रेस घालून उर्वशी कान्समध्ये पोहोचली होती. तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
मात्र उर्वशीच्या लूकपेक्षा चर्चेचा विषय ठरली ती अभिनेत्रीने घेतलेली बिकिनी बॅग.
सोनं आणि हिऱ्यांनी मढवलेली बिकिनी बॅग घेऊन उर्वशी कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली. कान्समध्ये तिने तिची बिकिनी बॅग फ्लॉन्ट केली.
उर्वशीचे कान्स फेस्टिव्हलमधील हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले असून तिच्या बिकिनी बॅगची चर्चा रंगली आहे.
उर्वशीचा कान्स फेस्टिव्हलमधील हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.