Flashback 2022 : लग्नाची बेडी! आलिया-रणबीरच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींनी सरत्या वर्षात बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 04:06 PM2022-12-21T16:06:06+5:302022-12-21T19:24:12+5:30

Bollywood Weddings This Year: या वर्षी बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंत मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी लग्न बंधनात अडकलं. अनेक सेलिब्रिटी जोड्यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.

आलिया भट आणि रणबीर कपूरनं एकमेकांना जवळपास ५ वर्ष डेट केल्यानंतर यावर्षी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिल २०२२मध्ये आलिया आणि रणबीर लग्न बंधनात अडकले. कुटुंबीय आणि जवळचं मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थिती हा विवाहसोहळा पार पडला.

रिचा आणि अली हे दोन वर्षांपूर्वीच लग्न करणार होते. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. 6 ऑक्टोबरला दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या.

साऊथ स्टार नयनताराने विग्नेशसोबत 9 जून 2022 रोजी लग्न केलं. दोघे 2015 पासून एकमेकांना डेट करत होते.

अलीकडेच आणखी एक साऊथची अभिनेत्री हंसिका मोटवानीनेही तिचा बॉयफ्रेंड सोहेलसोबत ४ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

नागिन फेम मौनी रॉयनं सुद्धा याचवर्षी सूरज नांबियारसोबत सात फेरेही घेतले. दोघांनी 27 जानेवारीला गोव्यात लग्न केले.

अभिनेता विक्रांत मेस्सीनं ही 14 फेब्रुवारी रोजी शीतल ठाकूरसोबत लग्न केले. दोघे 2015 पासून एकमेकांना डेट करत होते.

बॉलिवूड सिंगर पलक मुच्छल आणि म्युझिक कंपोझर मिथुन 6 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकले.

फरहान अख्तरने 17 फेब्रुवारी रोजी गायिका शिबानी दांडेकरसोबत लग्न केले. फरहानचं हे दुसरं लग्न आहे.

देवोलीनाने 14 डिसेंबर रोजी जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.