कधी घरोघरी जाऊन साबण विकून शाळेची फी भरत होता, आज कोट्यावधीच्या संपत्ती मालक आहे 'बॅडमॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:10 PM2022-02-07T18:10:51+5:302022-02-07T18:16:32+5:30

Gulshan Grover Facts : गुलशन ग्रोवरने मोठ्या पडद्यावर 'बॅडमॅन', 'शंकर बिहारी', 'किंग डॉन', 'टायसन', 'केकड़ा', 'कबीरा' सहीत व्हिलनच्या अनेक दमदार भूमिका केल्या आहेत. तो आपल्या आवाजाने आणि दमदार आवाजाने सिनेमाच्या हिरोलाही हादरवून सोडतो.

बॉलिवूडचा 'बॅडमॅन' गुलशन ग्रोवर (Gulshan Grover)ला कुणी ओळखत नाही असा क्वचितच कुणी सापडेल. तो एक असा अभिनेता आहे ज्या इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख ठेवली आहे. गुलशन ग्रोवरने मोठ्या पडद्यावर 'बॅडमॅन', 'शंकर बिहारी', 'किंग डॉन', 'टायसन', 'केकड़ा', 'कबीरा' सहीत व्हिलनच्या अनेक दमदार भूमिका केल्या आहेत. तो आपल्या आवाजाने आणि दमदार आवाजाने सिनेमाच्या हिरोलाही हादरवून सोडतो. आज गुलशन कुमारने इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं आहे.

गुलशन ग्रोवरचा जन्म २१ सप्टेंबर १९५५ मध्ये दिल्लीमध्ये झाला होता. त्याने त्याचं सुरूवातीचं शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं. बॅडमॅनने दिल्लीच्या प्रसिद्ध श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पोस्ट ग्रॅज्यूएट केलं. गुलशन ग्रोवरला बालपणापासून अभिनयाची आवड होती. यामुळे तो ७०च्या दशकात दिल्लीतील प्रसिद्ध थिएटर ग्रुप लिटिल थिएटर ग्रुपसोबत जुळला आणि इथेच त्याने अभिनयाचे बारकावे शिकले.

२०१९ मध्ये गुलशन ग्रोवरची आटोबायोग्राफी 'Bad Man' रिलीज झाली होती. याचं लेखन रोश्मिला भट्टाचार्य आणि गुलशन ग्रोवरने केलं आहे. यात गुलशनने लिहिलं आहे की, तो त्याचे शाळेची फी भरण्यासाठी वस्तू विकायचा. तो घरोघरी जाऊन भांडी आणि डिटर्जेंट पावडर विकत होता. कारण त्या काळात घरची परिस्थिती बिकट होती.

१९७० मध्ये गुलशन ग्रोवर अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला. मुंबईमध्ये आल्यावर मुंबईतील एका प्रसिद्ध फिल्म स्टुडिओत त्याने अभिनयाचं औपचारिक ट्रेनिंग घेतलं. यावेळी अभिनेता अनिल कपूर त्याचा बॅचमेट होता. त्यानंतर त्या अॅक्टिंग स्कूलमध्ये तो शिक्षकही बनला. आज बॉलिवूडचे अनेक स्टार्स त्याचे विद्यार्थी राहिले आहेत.

गुलशन ग्रोवरने अभिनयाची सुरूवात १९८० मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्तीच्या 'हम पांच' मधून केली होती. यात त्याने एक छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर तो 'राम लखन', सौदागर, 'सर', 'मोहरा', 'राजा बाबू', 'विजयपथ', 'दिलवाले', 'यस बॉस', 'खिलाड़ियों का खिलाड़ी', 'हेरा फ़ेरी', '16 दिसंबर', 'जिस्म', 'गॅगस्टर', 'आई एम कलाम' आणि 'सूर्यवंशी' सारख्या अनेक सिनेमात काम केलं.

गुलशन ग्रोवरने दिलीप कुमार, राजकुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, शाहरुख ख़ान, सलमान ख़ान, आमिर ख़ान, अक्षय कुमार, अजय देवगन, सनी देओल, अनिल कपूर, गोविंदासहीत अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत काम केलं आहे. आतापर्यंत त्याने १५० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. त्यासोबतच त्याने हॉलीवुड, मलेशियन, ईरानी आणि कॅनेडियन सिनेमातही दिसला आहे.

गुलशन ग्रोवरला २००१ आणि २००६ मध्ये बेस्ट व्हिलनचा अवॉर्ड मिळाला होता. २०१२ मध्ये त्याला 'आय एम कलाम' सिनेमासाठी स्टारडस्ट अवॉर्ड मिळाला होता. असे अनेक अवॉर्ड त्याने आपल्या नावावर केले आहेत.

बॉलिवूडचा बॅडमॅन गुलशन ग्रोवरने १९९८ मध्ये फिलोमिना ग्रोवरसोबत लग्न केलं. पण २००१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. गुलशन आणि फिलोमिनाला एक मुलगाही आहे. ज्याचं नाव संजय ग्रोवर आहे. गुलशन ग्रोवरने त्यानंतर २००१ मध्ये कशिश ग्रोवरसोबत लग्न केलं. पण एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुलशन ग्रोवरकडे एकूण १८ मिलियन डॉलर म्हणजे १३२ कोटी रूपयांची संपत्ती आहे. यातील जास्तीत जास्त कमाई त्याने अभिनयातून केली. तो एका सिनेमासाठी २ ते ३ कोटी रूपये मानधन घेतो. त्यासोबतच जाहिरातीसाठी तो १ कोटी रूपये घेतो. मुंबईच्या अंधेरी भागात त्याचं एक आलिशान घर आहे. ज्याची किंमत ३० कोटी रूपये आहे.