IN PICS : सारा अली खान ते सुहाना, जान्हवी... जाणून घ्या किती शिकलेत तुमचे आवडते स्टार किड्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 05:47 PM2022-08-03T17:47:11+5:302022-08-03T17:56:36+5:30

Bollywood Star Kids : सेलिब्रिटींची पोरं सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात. पण या स्टारकिड्सचं शिक्षण किती झालंय, हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग अशाच काही स्टार किड्सच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया.

अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आज मोठी स्टार म्हणून ओळखली जाते. साराचं प्राथमिक शिक्षण मुंबईतील बेसेण्ट मॉन्टेसरी शाळेतून झालं. त्यानंतर तिने कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माते बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर आज बॉलिवूडची मोठी स्टार आहे. तिनेदेखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. याशिवाय स्ट्रेसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिटयूट, कॅलिफोर्निया मधून तिने अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे.

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेने कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर चित्रपटात काम करण्यासाठी अनन्याने शिक्षण सोडून दिलं.

सुहाना खान किंगखान शाहरुख खानची लाडकी लेक. लवकरच तिचा डेब्यू होतोय. सुहानाचं दहावीपर्यंतच शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झालं. त्यानंतर तिने इंग्लंडच्या एर्डिंग्ली कॉलेजमधून पुढचं शिक्षण घेतलं आहे.

आर्यन खान हा शाहरूख खानचा मोठा मुलगा. मध्यंतरी तो भलत्याच कारणाने चर्चेत आला होता. आर्यनला हिरो बनण्यात काहीही इंटरेस्ट नाही. आर्यन लंडनच्या सेव्हन ओक्स स्कूलमधून ग्रॅज्युएट झाला आहे. यानंतर त्याने युनिव्हर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्नियातून फिल्म मेकिंगचा कोर्स केला.

अमृता सिंग आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान चित्रपटांपासून दूर आहे. पण वडिलांची कार्बन कॉपी असल्यामुळे तो सतत चर्चेत असतो. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून त्याने दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. यानंतर उच्च शिक्षणासाठी ते लंडनच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये गेला.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सतत चर्चेत असते. तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चाही होताना दिसतात. नव्याने लंडनच्या सेव्हनओक्स स्कूल मधून शिक्षण घेतलं आहे. ती सध्या न्यूयॉर्कमधील फोर्डहम युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे.

आरव भाटिया हा अक्षय कुमारचा मुलगा. आरव सोशल मीडियावर फारसा अ‍ॅक्टिव्ह नाही. आरवने इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. यानंतर उच्चशिक्षणासाठी तो सिंगापूरला गेला. तिथे युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ इस्ट एशिया टेनिसमध्ये तो शिकतो आहे.

न्यासा देवगण ही काजोल व अजय देवगणची लाडकी लेक. तिने सिंगापूरच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून तिचं प्राथमिक शिक्षण झालं.