Weight Loss : २२० किलो ते ७५ किलो, असं केलं अदनान सामीनं ट्रान्सफॉर्मेशन; वाचा कसा होता डाएट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 08:20 PM2022-06-27T20:20:49+5:302022-06-27T20:34:30+5:30

Adnan Sami transformation: बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अदनान सामी आपल्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा डाएट आणि वर्कआऊट कसं होतं, हे पाहूया.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी हा अनेकदा आपल्या वजनामुळे ट्रोल झाला होता. काही वर्षांपूर्वी त्याचं वजन २२० किलो इतकं होतं. परंतु आता त्याचं वजन केवळ ७५ किलोंवर आलं आहे.

या ट्रान्सफॉर्मेशन मागे त्याची मेहनत आहेच, पण स्ट्रिक्ट डाएट आणि फिजिकल अॅक्टिव्ह असणं हे त्यामागील महत्त्वाचं कारण आहे. त्यानं आपलं ट्रान्सफॉर्मेशन कसं केलं हे जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार अदनान २००५ मध्ये अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला होता. परंतु काही वेळानंतर तो जेव्हा समोर आला तेव्हा तो खुप बारीक झाला होता. त्याला ओळखणंही कठीण झालं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार अदनान २००५ मध्ये अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला होता. परंतु काही वेळानंतर तो जेव्हा समोर आला तेव्हा तो खुप बारीक झाला होता. त्याला ओळखणंही कठीण झालं होतं.

२००५ मध्ये लिम्फेडेमासाठी एक शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याला ३ महिने आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे त्याचं वजन अधिकच वाढलं होतं. त्याला कालांतरानं श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आपलं कुटुंब आणि मित्रांच्या मदतीनं ह्युस्टनमध्ये एक न्युट्रिशनिस्टच्या सल्ल्यानुसार वेट लॉसचा प्रवास सुरू केला. त्यानं जवळपास १६ महिन्यांमध्ये जवळपास १५०-१५५ किलो वजन कमी केलं. आपण वजन कमी करण्यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचं त्यानं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

त्यानंतर आपलं कुटुंब आणि मित्रांच्या मदतीनं ह्युस्टनमध्ये एक न्युट्रिशनिस्टच्या सल्ल्यानुसार वेट लॉसचा प्रवास सुरू केला. त्यानं जवळपास १६ महिन्यांमध्ये जवळपास १५०-१५५ किलो वजन कमी केलं. आपण वजन कमी करण्यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचं त्यानं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी लिपोसक्शन सर्जरी करून घेतात. परंतु २२० किलोच्या व्यक्तीसाठी अशाप्रकारे फॅट हटवणं अशक्य होतं. ते आपल्यासारख्या अधिक वजन असलेल्या व्यक्तींसाठी नव्हतं, असंही त्यानं सांगितलं होतं.

जेव्हा मी वेट लॉसचा प्रवास सुरू केला तेव्हा मी अखेरचा मॅश केलेले बटाटे, नॉन व्हेज आणि चीज केक खाल्ला. त्यानंतर पुढच्याच दिवसापासून लो कार्ब आणि हाय प्रोटिन फूड सुरू केल्याचं अदनानं सांगितला होता.

ह्युस्टनच्या न्यूट्रिशनिस्टद्वारे अदनान सामीची इमोशनल इटिंगची सवय सोडवण्यात आली. त्यानंतर त्याला लो कॅलरी असलेले पदार्थ खाण्यास देण्यात आले. डाएटमध्ये ब्रेड, अनहेल्दी फूड, भात यासारखे पदार्थ सोडवण्यात आले. त्याला केवळ सॅलड, मासे आणि उकडलेली डाळ खाण्याचा सल्ला देण्यात आला होता.

सुरूवातीला त्याला साखरेशिवाय चहा देण्यात येत होता. दुपारच्या जेवणात सॅलड आणि मासे खाण्यास देण्यात येत होते. रात्री त्याला भात आणि चपातीशिवाय साधी उकडलेली डाळ किंवा चिकन देण्यात येत होतं. तो केवळ शुगर फ्री ड्रिंक घेत होता. सकळाच्या नाश्त्यात त्याला पॉपकॉर्न खाण्यात देण्यात येत होते.

जेव्हा त्याचं वजन ४० किलो कमी झालं तेव्हा तो ट्रेडमिलवर चालण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्याला थोडा व्यायामही करण्यास सांगितला. भारतात प्रशांत सावंत हे त्याचे ट्रेनर होते. अदनान सामीकडून आठवड्यात ६ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ एक्सरसाईज करवण्यात आले. दर महिन्याला यानंतर त्याचं वजन १० किलो कमी झालं. सध्या त्याचं वजन ७५ किलो असल्याचं सांगण्यात येत आहे.