"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:17 IST2025-10-20T17:28:34+5:302025-10-20T18:17:27+5:30
Bollywood Actress Bathroom Secret : बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं निरोगी अन् मुलायम त्वचेमागचं गुपित

Bollywood Actress Bathroom Secret :
बॉलिवूड आणि ग्लॅमर हे एक अजोड असे समीकरण आहे. बॉलिवूड अभिनेत्रींना चित्रपटात काम मिळवण्यासाठी अभिनय, फिटनेस आणि सौंदर्य या तिन्ही गोष्टींची हमखास गरज असते.
स्वत:ला कायम ताजेतवाने ठेवण्यासाठी प्रत्येक अभिनेता-अभिनेत्री विविध गोष्टी करत असतात. काही अभिनेत्री योगसाधना करतात, तर काही अभिनेत्री त्वचेची निगा राखण्यासाठी खास उपाय करतात.
आपले सौंदर्य टिकवण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी अभिनेत्री खास पद्धतीचे रूटीन फॉलो करतात. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिचे 'बाथरूम सीक्रेट' म्हणजेच आंघोळीबद्दलचे गुपित सांगितले आहे.
'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री विद्या मालवदे हिने केलेला खुलासा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिने सांगितले, "गेल्या दहा वर्षांत तिने साबणाला हातही लावलेला नाही."
"मी साबणाचा वापर केलेला नाही. पण तरीही माझी त्वचा निरोगी आणि आजही तितकीच मऊ आहे. माझी आंघोळीची पद्धत पारंपरिक असून त्यात ध्यानधारणेचाही समावेश आहे."
"आंघोळीदरम्यान मी थोडावेळ पाण्याबाहेर उभी राहते. चमचाभर मीठात पाण्याचे थेंब टाकून ते संपूर्ण शरीराला चोळते. त्यानंतर ३० सेकंद ध्यान करून पुन्हा स्वच्छ आंघोळ करते."
"मीठ आपल्यातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. ते नैसर्गिक क्लीनजिंग आहे. महिन्यातून सलग १० दिवस अशाप्रकारची आंघोळ मी करते आणि मग ब्रेक घेते."
"मग इतर दिवशी नुसते पाणी, गुलाबजल किंवा बेसन-उटणे वापरते. खूप घाम, आऊटडोअर शूट किंवा प्रदूषित वातावरणात केवळ पाणी पुरेसे नसते. घामामुळे दुर्गंधी, इन्फेक्शनचा धोका असतो."
"शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी बेसन-उटणे किंवा गुलाबजलसारखा पर्याय चांगला असतो. त्याने त्वचाही मुलायम राहण्यास मदत होते," असे विद्याने स्पष्ट केले.