काजोल ते समीरा रेड्डी! बॉलिवूडच्या 'या' 7 अभिनेत्रींनी लग्नात केला होता महाराष्ट्रीयन लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 11:38 AM2023-12-17T11:38:57+5:302023-12-17T11:56:47+5:30

Bollywood actress: सध्या बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे ज्यांनी त्यांच्या लग्नात मराठमोळा लूक केला होता.

बॉलिवूड कलाकारांची लग्न म्हणजे जणू सोहळाच असतो.सध्या बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे ज्यांनी त्यांच्या लग्नात मराठमोळा लूक केला होता. या अभिनेत्री कोण ते पाहुयात.

काजोल - बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे काजोल. अभिनेत्री तनुजा यांची लेक असलेली काजोल मूळची महाराष्ट्रीयन आहे त्यामुळे तिने लग्नातही तिचा मराठमोळेपणा जपला.

काजोलने तिच्या लग्नात पारंपरिक मराठमोळा लूक केला होता. काजोलने अभिनेता अजय देवगणसोबत लग्नगाठ बांधली आहे.

समीरा रेड्डी - अभिनेत्री समीरा रेड्डी हिने मराठमोळा बिझनेस मॅन अक्षय वर्दे याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे समीराने तिच्या लग्नातही मराठमोळा लूकच केला होता.

जेनेलिया डिसुझा - जेनेलिया डिसुझा आणि रितेश देशमुख यांची लव्हस्टोरी तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांचा विवाहसोहळा तर देशभरात गाजला होता.

जेनेलिया आणि रितेशचं लग्न मराठमोळ्या पद्धतीने झालं होतं. त्यामुळे या लग्नात जेनेलियाने पारंपरिक मराठमोळा लूक केला होता.

अंकिता लोखंडे - अंकिता लोखंडेचा लग्नसोहळा कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नव्हता. हळदी, मेहंदी असे सगळे फंक्शन तिच्या लग्नात पाहायला मिळाले. या लग्नात तिने केलेला महाराष्ट्रीन लूक जास्त चर्चेत आला.

नेहा पेंडसे- नेहाने शार्दुल बायससोबत लग्न केलं आहे. या लग्नात तिचा मराठमोळा लूक आणि खासकरुन तिने घातलेली नथ अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली होती.

मुग्धा चाफेकर - लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा चाफेकरने रविश देसाईसोबत लग्न केलं आहे. या जोडीने त्यांच्या लग्नात मराठमोळा लूक केला होता.

गौरी प्रधान - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौरी प्रधान हिने अभिनेता हितेश तेजवानी याच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नात गौरीने मराठमोळा लूक केला होता.