एकेकाळी झाडांच्या मागे कपडे बदलायची 'ही' अभिनेत्री; आज घेतली 65 लाखांची व्हॅनिटी व्हॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 05:40 PM2023-03-20T17:40:42+5:302023-03-20T17:46:21+5:30

Bollywood actress: या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सोफा कोरलेला असून खुर्च्याही लाकडापासून तयार केल्या गेल्या आहेत.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत.

समाजात वा कलाविश्वात कोणतीही घटना घडली की त्यावर उघडपणे कंगना भाष्य करते.

करिअरच्या सुरुवातीला संघर्ष करणारी कंगना आज बॉलिवूडची टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

सध्या कंगना तिच्या नव्या व्हॅनिटी व्हॅनमुळे चर्चेत येत आहे.

सुरुवातीच्या काळात कंगनाने अनेक संघर्ष केला. इतका की तिला शुटिंगदरम्यान झाडांच्या किंवा खडकांच्या मागे जाऊन कपडे बदलायची.

आज त्याच कंगनाने प्रचंड महाग अशी व्हॅनिटी व्हॅन घेतली आहे.

कंगनाने नुकतीच एक नवीन व्हॅनिटी व्हॅन घेतली असून त्याची किंमत चक्क ६५ लाख रुपये आहे.

कंगनाने नुकतीच एक नवीन व्हॅनिटी व्हॅन घेतली असून त्याची किंमत चक्क ६५ लाख रुपये आहे.

कंगनाची ही व्हॅन केतन रावल याने डिझाइन केली आहे. त्यामुळे या व्हॅनचं वैशिष्ट्यही त्याने सांगितलं.

'कंगनाला तिच्या व्हॅनिटी व्हॅनसाठी पारंपरिक लूक हवा होता. तिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये घर अनुभवायचे होते. म्हणूनच तिला तिची व्हॅनिटी व्हॅन तिच्या घराच्या लूकप्रमाणे कस्टमाईज करायची होती.

कंगनाच्या या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सोफा कोरलेला असून खुर्च्याही लाकडापासून तयार केल्या गेल्या आहेत.