१८ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्डशी कनेक्शन; आता अशी दिसते ९०च्या दशकातील 'ओये ओये गर्ल', फोटो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:06 IST2025-11-07T16:53:15+5:302025-11-07T17:06:35+5:30

१८ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्डशी कनेक्शन; आता अशी दिसते ९०च्या दशकातील 'ओये ओये गर्ल', फोटो पाहून ओळखूच शकणार नाही

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर अभिनय क्षेत्राला रामराम करत आपलं वेगळं विश्व निर्माण केलं.या अभिनेत्रींमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सोनमचाही नंबर लागतो.

त्रिदेव, विजय आणि अजूबा यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून झळकणाऱ्या सोनम खानची एकेकाळी चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती.

सोनमचं खरं नाव बख्तावर खान हे होतं. ती अभिनेते रजा मुराद यांची भाची आहे. ९० च्या दशकातील फॅशन आयकॉन म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं.

सोनम त्रिदेव सिनेमात ओए ओए गाण्यामुळे तर ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली होती.आजही लोक तिचं ते गाणं विसरले नाहीत.मात्र,सोनम तिच्या बोल्ड लूकमुळे त्याकाळी चर्चेत होती.

बॉलिवूडसह तिने तेलगू सिनेमातही आपलं नशीब आजमावलं.पण, अचानक यशाच्या शिखरावर असताना सोनमने इंडस्ट्रीला रामराम केला. यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं सांगितलं जातं.

१९९१ मध्ये राजीव राय यांच्याशी लग्न केल्यानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. लग्नानंतर त्यांच्यामध्ये खटके उडू लागले आणि मग ते दोघेही विभक्त झाले.

एकेकाळी आपल्या सौंदर्य आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी ही नायिका आता फारच बदलली आहे.

सोनम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र,इतक्या वर्षानंतर अभिनेत्रीचा लूक पूर्णपणे बदलला आहे.