जय श्रीराम! अयोध्या नगरीत रमली सोनाली बेंद्रे; प्रभू श्रीरामांच्या भक्तीत झाली तल्लीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 18:07 IST2024-12-10T18:02:36+5:302024-12-10T18:07:42+5:30
बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे सोनाली बेंद्रे.

सोनाली बेंद्रे ९० च्या काळातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनेत्रीने तिच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आजही चाहत्यांमध्ये ती प्रसिद्ध आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे अभिनयपासून दूर असली तरी कायमच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असते. त्याद्वारे आपल्या संदर्भात वेगवेगळे अपडेट्स अभिनेत्री देते.
नुकतेच सोनालीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
सोनाली प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अयोध्या नगरीत गेली आहे. अयोध्येत जाऊन अभिनेत्री भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय.
"सोनेरी दिवे, पवित्र मंत्र आणि दैवी आभास, जय श्रीराम!" असं कॅप्शन सोनाली बेंद्रेने या फोटोंना दिलं आहे.