सावळ्या रंगामुळे झाली चेष्टा! 'सौगंध' चित्रपटातील अक्षयची हिरोईन आठवतेय? आता दिसते अशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:06 IST2025-10-10T14:59:37+5:302025-10-10T15:06:16+5:30
'सौगंध' चित्रपटातील अक्षयची हिरोईन आठवतेय? अभिनेत्रीचा बदलला लूक,पाहा फोटो

हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच चित्रपटात अभिनय करुन नाव कमाविणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे शांतीप्रिया.
बॉलिवूड ते दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणाऱ्या नायिकेनं तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना, शांतीप्रियाने 'बाजीगर' फेम प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ रेशी लग्न केलं आणि ती इंडस्ट्रीतू गायब झाली.
मात्र,२००४ मध्ये सिद्धार्थ रेचं निधन झालं. त्यानंतर अभिनेत्री पूर्णपणे खचली. आता जवळपास ३५ वर्षानंतर ही नायिका रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.
नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या 'बॅड गर्ल' चित्रपटातून कलाविश्वात कमबॅक केलं. त्यामुळे ही अभिनेत्री चर्चेत आली आहे.
जवळपास ३५ वर्षानंतर अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सौगंध चित्रपटातील ही नायिका आता फारच वेगळी दिसते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून शांती प्रिया चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. शांती प्रिया पूर्वीपेक्षा स्टाईलिस्ट दिसते. तिचे फोटो पाहून चाहते ओळखू शकणार नाहीत.