PHOTO: ब्युटी इन ब्लॅक! ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंहचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:13 IST2025-01-07T13:06:59+5:302025-01-07T13:13:48+5:30

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंहच्या ग्लॅमरस अदा, फोटो चर्चेत.

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या अभिनयाबरोबरच फॅशनसेन्समुळे सुद्धा चर्चेत येते.

सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

अभिनेत्रीने २०१४ मध्ये आलेल्या 'यारियॉं' या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

रकुलने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

दरम्यान, नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काळ्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

ऑफ शोल्डरमध्ये ड्रेसमधील अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदा पाहून नेटकरी देखील घायाळ झाले आहेत.

रकुलने तिच्या फिल्मी कारकिर्दीत 'यारियॉं' चित्रपटानंतर 'सरदार का नातू', 'शिमला मिर्ची', 'आय लव्ह यू', 'रनवे 34', 'डॉक्टर जी', 'छत्रीवाली' आणि 'दे दे प्यार दे' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली.