नवाब शाहने असे केले होते पूजा बत्राला प्रपोज, फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 06:00 IST2020-06-01T06:00:00+5:302020-06-01T06:00:02+5:30

पूजा बत्राने गेल्या वर्षी अचानक लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
पूजाने अभिनेता नवाब शाहसोबत लग्न केले. त्याने तिला कशाप्रकारे प्रपोज केले हे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.
पूजाने इन्स्टाग्रामवर नवाबचा गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
नवाब आणि पूजाची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.
नवाब आणि पूजा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून ते त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
पूजा आणि नवाबने जुलै 2019 मध्ये आर्य समाज मंदिरात अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न केले.
नवाब आणि पूजा यांनी त्यानंतर मुस्लिम पद्धतीने देखील लग्न केले.
पूजा आणि नवाब यांचे अनेक फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.