PHOTO: 'रुप सुहाना लगता है...! खुशी कपूरचा ग्लॅमरस अंदाज, फोटोंवरुन हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:28 IST2025-01-21T18:21:47+5:302025-01-21T18:28:23+5:30
अभिनेत्री खुशी कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आली आहे.
'लव्हयापा' असं या सिनेमाचं नाव आहे. येत्या ७ फेब्रुवारीला २०२५ ला हा सिनेमा थिएटमध्ये सर्वांना पाहता येईल.
या चित्रपटामध्ये खुशी कपूर आणि जुनैद खान एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
'लव्हयापा'बद्दल आता सिनेरसिकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, खुशी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असल्याची पाहायला मिळते आहे.
नुकतेच तिने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून सुंदर फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री या फोटोंमधील ग्लॅमरस अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.