ट्विंकल खन्ना नव्हे काजोल होती 'मेला'साठी पहिली पसंती; आमिरमुळे अभिनेत्री सोडला सिनेमा,कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 09:39 AM2023-10-30T09:39:17+5:302023-10-30T09:46:10+5:30

Kajol: काजोलच्या नकारानंतर या भूमिकेसाठी ट्विंकलला विचारणा करण्यात आली.

आपल्या मस्तीखोर अंदाजामुळे आणि अभिनयामुळे प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल (Kajol). आजवरच्या कारकिर्दीत काजोलने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

काजोलने आतापर्यंत अनेक सुपरहिट अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. परंतु,एक सिनेमा असा होता जिथे आमिर खानला कास्ट केल्यामुळे तिने या सिनेमासाठी नकार दिला.

२००० साली रिलीज झालेला मेला हा सिनेमा साऱ्यांनाच आठवत असेल. या सिनेमात आमिर खान, ट्विंकल खन्ना यांनी मुख्य भूमिका साकारली.

या सिनेमासाठी ट्विंकलपूर्वी काजोलला विचारणा करण्यात आली होती. मात्र, तिने आमिरचं नाव ऐकताच नकार दिला.

एका मुलाखतीमध्ये काजोलने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे. आमिर एक उत्तम कलाकार आहे. त्यामुळे तो त्याच्या सिनेमाला बेस्ट करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. त्यामुळे मी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला.

काजोलच्या नकारानंतर या भूमिकेसाठी ट्विंकलला विचारणा करण्यात आली. परंतु, ट्विंकलने ही भूमिका अत्यंत सुंदररित्या साकारुन हिट केली.

आमिर आणि ट्विंकल यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र, ट्विंकलची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली.

काजोल आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. काही काळापूर्वीच तिची द ट्रायल ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.