"चाहत्याने रक्ताने पत्र लिहिलं अन्...", 'कहो ना प्यार है' रिलीज झाल्यावर अमिषा पटेलला आला विचित्र अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:55 IST2025-01-15T16:47:10+5:302025-01-15T16:55:09+5:30
अमिषा पटेल बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

बॉलिवूडसारख्या झगमगत्या विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणं हे मोठं आव्हानचं आहे.
प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी काहींना प्रचंड संघर्ष करावा लागला तर काहींना रातोरात स्टारडम मिळाला. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री अमिषा पटेल.
अमिषाने तिच्या करिअरच्या डेब्यू फिल्ममधून प्रचंड लोकप्रियता मिळवली. जवळपास २५ वर्षांपूर्वी आलेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटात तिने हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केली. प्रदर्शनाच्या दिवसापासून 'कहो ना प्यार है' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले.
आता जवळपास २५ वर्षांनंतर 'कहो ना प्यार है' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे.
दरम्यान, हिंदुस्तान टाइम्स' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिषा पटेलने चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर तिल्या आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं आहे. त्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "मला या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद होतोय की लोकांना हा सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहायचा आहे. हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित व्हावा अशी त्यांची इच्छा होती. खरंतर, हेच 'कहो ना प्यार है' सिनेमाचं यश आहे. मी स्वत: ला भाग्यावान समजते की मी देखील या सिनेमाचा भाग आहे. यामध्ये माझा एक रॉ-परफॉर्मन्स होता आणि तो लोकांना आवडला."
पुढे अभिनेत्रीने म्हणाली की, "त्यावेळी लोकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. शिवाय तेव्हा काही लोकं मंदिर आणि चर्चमध्ये आमच्या फोटोसोबत लग्न करायचे. इतकंच नाही तर एका चाहत्याने मला मेल देखील केला होता ज्यामध्ये माझ्या भांगेत कुंकू लावलेला होता आणि त्यावर तू माझी आहेस असं लिहिलं गेलं होतं."
"सगळ्यात विचित्र अनुभव म्हणजे एका चाहत्याने चक्क रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये अस लिहिलं होतं की, सोनिया तू बॉबी देओलसोबत काम कसं करु शकतेस? त्यावेळी मी खूप घाबरले होते." असा खुलासा देखील अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये केला.