अभिनेत्रीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न ठरलं, पत्रिकाही छापल्या, पण आईचं निधन झालं अन् घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:03 IST2025-08-12T16:48:55+5:302025-08-12T17:03:29+5:30
ही कहाणी वाचून तुम्हीही भावुक व्हाल. अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात लग्न करणार होती. पण अचानक तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, मग पुढे काय घडलं?

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिचं लग्न ठरलं होतं. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. पण अचानक अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं. आणि अभिनेत्रीने एक मोठा निर्णय घेतला
ही अभिनेत्री म्हणजे जुही चावला. जुहीने खऱ्या आयुष्यात जय मेहतासोबत लग्न केलं. जुही आणि जयची लव्हस्टोरी एकदम खास होती.
जुही आणि जयची भेट एका डिनर पार्टी दरम्यान झाली होती. जूही त्यावेळी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. दोघांमध्ये बोलणं सुरु झालं.
जुही आणि जयच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये इतकं प्रेम होतं की जय तिला ट्रक भरुन गुलाब पाठवायचा असं सांगितलं जातं.
नात्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जुही आणि जयने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. भव्य पद्धतीने जय-जुही एकमेकांशी लग्न करणार होते. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या.
पण लग्नाच्या काही दिवस आधी जुहीच्या आईचं निधन झालं. जुहीच्या कुटुंबावर शोककळा पसरली. या काळात जुहीला लग्न साधेपणाने करायचं होतं.
जय मेहता आणि त्याच्या कुटुंंबाने जुहीच्या मनाचा विचार केला आणि तिच्या म्हणण्याचा मान राखला. त्यामुळेच जुही-जयचं लग्न साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालं