शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्यानं चित्रपटातून काढलं बाहेर; ईशा गुप्तालाही आलेला कास्टिंग काउचचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:02 PM2024-04-13T18:02:56+5:302024-04-13T18:09:18+5:30

ईशा गुप्ता ही बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ईशा गुप्ताची ओळख आहे.पण, तिचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता. अभिनेत्रीला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दोन वेळा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.

एका मुलाखती दरम्यान ईशाने याबाबतीत खुलासा केला होता. एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी ईशा गुप्ताला फार वाईट अनुभव आला होता असं तिनं म्हटलं.

एका चित्रपटाचं शूटिंग करताना चित्रपटाच्या निर्मात्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यास तुला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल अशी धमकीही त्याने दिली होती.

जवळपास अर्ध शूटिंग झाल्यानंतर मला अचानक सांगण्यात आलं की, तु या पुढे चित्रपटात काम करू शकत नाही. ईशाने निर्मात्याकडे विनवणी करून देखील तिला काम करण्यास नकार दिला.

आऊटडोअर शूट करण्याच्या बहाणा करून दिग्दर्शकाने तिला फसवण्याचा डाव रचला होता. पण त्याचा हा कट अभिनेत्रीने अत्यंत हुशारीने उधळून लावला.

२०१२ मध्ये आलेल्या 'जन्नत' या सिनेमाच्या माध्यमातून ईशाने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. अलिकडेच ईशा 'आश्रम-३' या वेबसिरीजमुळे चर्चेत आली होती.

'राज -३ डी', 'गोरी तेरे प्यार में', 'हमशक्ल','रुस्तम', 'टोटल धमाल', 'पलटन', 'बादशाहो' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे.