'या' अभिनेत्रीला दोन वेळा आलाय कास्टिंग काऊचचा अनुभव, "गोरेपणासाठी व्हाईटनिंग इंजेक्शन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 10:00 AM2023-11-28T10:00:19+5:302023-11-28T10:10:51+5:30

पहिल्याच सिनेमामुळे रातोरात झाली स्टार पण कास्टिंग काऊचमुळे गमावले चित्रपट

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. ईशा मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेची विजेती आहे. २००७ साली तिने ही स्पर्धा जिंकली आणि ती नावारुपाला आली.

2012 साली ईशाने जन्नत 2 मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिचा पदार्पणातील पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला. यानंतर तिने 'राज 3' मध्या काम केले. दोन्ही सिनेमात तिची आणि इमरान हाश्मीची जोडी होती.

पहिल्या दोन सिनेमांनंतर मात्र ईशाला फारसं यश मिळालं नाही. 2019 साली तिचा 'वन डे' हा शेवटचा सिनेमा होता. यामध्ये अनुपम खेरही होते. मात्र सिनेमा चांगलाच आपटला. आता गेल्या चार वर्षांपासून ती मोठ्या पडद्यावरुन गायब आहे.

पहिल्या दोन सिनेमांनंतर ईशाला जास्त ऑफर्स मिळाल्या नाहीत. याचं एक कारण हेही आहे की सावळ्या रंगामुळेही तिला अनेक टोमणे ऐकावे लागले होते. इतकंच नाही तर ऑडिशनवेळी गोरेपणासाठी तिला व्हाईटनिंग इंजेक्शन घेण्याचा सल्ला मिळाला होता. यामुळेच तिला फिल्ममध्ये कास्ट केलं जात नव्हतं.

ईशाला कास्टिंग काऊचचाही सामना करावा लागला आहे. एक दिवस आऊटडोअर शूटच्या बहाण्याने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला होता असं तिने सांगितलं होतं. २ लोकांनी मिळून हा कट रचला होता. मात्र मीही हुशारी दाखवत एका महिला मेकअप आर्टिस्टला माझ्यासोबत खोलीत झोपण्यास सांगितलं.

तर आणखी एक वेळा तिला सहनिर्मात्याकडून असा अनुभव आला होता. त्याने थेट तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. तेव्हा मी एका फिल्ममध्ये व्यस्त होते. याचं शूट अर्ध्याहून जास्त संपलं होतं. मी सहनिर्मात्याची मागणी ऐकली नाही तेव्हा त्याने मेकर्सला सांगत मला सिनेमातून बाहेर काढलं.

यानंतर अनेक मेकर्स तिला चित्रपटात घेण्यास तयार नव्हते. सगळेच आपापसात मिळालेले होते. मी त्यांची मागणी पूर्ण करु शकत नसेल तर मी फिल्म कशी करु शकेन असं लोकं म्हणताना मी ऐकलं आहे.

ईशा 'नकाब' आणि 'आश्रम 3' सारख्या वेबसिरीजमध्येही दिसली. लवकरच ती 'मर्डर 4' मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. शिवाय 'देसी मॅजिक' आणि 'हेरा फेरी 3' या सिनेमातही तिची भूमिका आहे.