सलमानच्या सिनेमातून रातोरात झाली स्टार! प्रेमासाठी करिअर सोडलं अन् धर्मही बदलला, आता काय करते वॉन्टेड गर्ल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:45 IST2026-04-10T16:33:29+5:302026-04-10T16:45:58+5:30
वयाच्या १९ व्या वर्षी झालं प्रेम, लग्नासाठी धर्म बदलला!आता काय करते 'वॉन्टेड गर्ल' आयेशा टाकिया? ओळखणंही झालंय कठीण

'वॉन्टेड' या चित्रपटाचा कधीही उल्लेख झाला की आठवते ती अभिनेत्री आयेशा टाकिया.या चित्रपटाच्या यशाने आयेशा एका रात्रीत सुपरस्टार झाली.आज अभिनेत्री आयेशा टाकियाचा जन्मदिवस आहे.

अभिनेत्री आयेशा टाकिया जन्म १० एप्रिल १९८६ मध्ये चा मुंबईत झाला. करिअरच्या सुरुवातीलाच तिचं इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत नाव आलं होतं.

२००० साली फाल्गुनी पाठक यांच्या 'मेरी चुनरी उड उड जाये' गाण्यातून आयेशा म्युझिक व्हिडिओत झळकली. पुढे २००४ मध्ये टारझन द वंडर कार या चित्रपटातून आयेशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमातून तिला प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली.

त्यानंतर 'वॉन्टेड', 'पाठशाला' आणि 'मॉड', 'ये दिल मांगे मोर', 'कॅश', 'शादी से पहले', 'शादी नंबर वन' या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करुन आयशा टाकियाने इंडस्ट्रीत स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

करिअरच्या सुरुवातीलाच तिचं नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झालं होतं. जेव्हा ती यशाच्या शिखरावर होती, तेव्हाच तिला आयुष्यात प्रेम मिळालं आणि तिने करिअर सोडलं. वयाच्या १९ व्या वर्षी आयेशा प्रेमात पडली होती.

आयशाने अल्पावधीत इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करत नाव कमावलं होते, पण तितक्याच कमी वेळात ती इंडस्ट्रीतून गायब झाली. आयशाने इस्लाम धर्म स्वीकारला, प्रियकराशी लग्न केलं आणि ग्लॅमर जगताला अलविदा म्हटलं.

आयशाचा नवरा फरहान हा बिझनेसमन आहे. तो हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाशीही संबंधित आहेत. याशिवाय फरहानला राजकारणातही खूप रस आहे.

आयशा व फरहानला मिकेल नावाचा मुलगा आहे. दोघेही मुलाबरोबर आनंदाने जगत आहेत.आयशा टाकियाचा पती समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी आहे.

आता आयेशा भले ही मायानगरीपासून दूर आहे, तरी ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.अलिकडेच तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं ते तिच्या लूकसाठी. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्काच बसला. कारण तिने ओठांची सर्जरी केली होती त्यामुळे तिचा लूक पूर्णपणे बदलून गेला होता.

















