आमिर-अक्षयसोबत केलं काम; १० वर्ष इंडस्ट्रीपासून दूर, आता काय करते 'गजनी' मधील 'ही' नायिका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:50 IST2025-10-27T15:30:41+5:302025-10-27T15:50:00+5:30
कुठे गायब झाली गजनी फेम अभिनेत्री? आता जगतेय 'असं' आयुष्य

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून येऊन हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावणाऱ्या काही मोजक्याच नायिका आहेत. या लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींच्या यादीत असिन हे नाव अव्वल स्थानावर येतं.

अभिनेत्री असीनचा जन्म २६ ऑक्टोबर १९८५ रोजी केरळमधील कोची येथे झाला.अभिनेत्रीचे वडील जोसेफ थोट्टूमकल सीबीआय अधिकारी होते.

असीनने कला शाखेत पदवी संपादन केली आहे. २००१ मध्ये मल्याळम चित्रपटातून वयाच्या १५ व्या वर्षी 'नरेंद्रन माकन जयकांत वाका' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. या चित्रपटाने असिनला फिल्मी दुनियेची दारे उघडी केली.

आमिर खान स्टारर गजनी या चित्रपटातून तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं. अभिनयासोबतच असिन प्रशिक्षीत भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. गजनी सिनेमाच्या यशानंतर तिने 'लंडन ड्रीम्स', 'रेडी', 'हाऊसफुल 2' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं.

क्वीन ऑफ कॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने प्रसिद्धीच्या शिखरावर असताना लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली.

२०१६ मध्ये तिने मायक्रोमॅक्स कंपनीतील पार्टनर व्यावसायिक राहुल शर्मासोबत लग्नगाठ बांधून ती परदेशात स्थायिक झाली.त्यांची एकूण संपत्ती १३०० कोटी रुपये आहे.

लग्न आणि मुलगी झाल्यानंतर तिने सिनेसृष्टीपासून दूर जाणं पसंत केलं. मिडिया रिपोर्टनुसार अभिनेत्रीची एकूण संपत्ती ३० कोटी इतकी आहे. लग्नानंतर ती लॅविश आयुष्य जगते आहे.

















