'हा' एक चुकीचा निर्णय आणि उद्धवस्त झालं गोविंदाचं करिअर; आजही होतोय पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 07:20 PM2023-05-01T19:20:00+5:302023-05-01T19:20:00+5:30

Govinda: असंख्य सुपरहिट सिनेमा देऊनही गोविंदा यांचा कलाविश्वातील वावर एकाएकी कमी झाला. यामागे त्यांची एक मोठी चूक जबाबदार असल्याचं म्हटलं जातं.

उत्तम अभिनयशैली आणि हटके डान्स स्टाइल यामुळे कायम चर्चेत राहिलेला अभिनेता म्हणजे गोविंदा.

गोविंदाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. ९० च्या दशकात त्याचे अनेक चित्रपट बॉक्सऑफिसवर तुफान गाजले.

राजा बाबू, हीरो नंबर वन, शोला और शबनम असे कितीतरी त्यांचे चित्रपट तुफान लोकप्रिय झाले.

असंख्य सुपरहिट सिनेमा देऊनही गोविंदा यांचा कलाविश्वातील वावर एकाएकी कमी झाला. यामागे त्यांची एक मोठी चूक जबाबदार असल्याचं म्हटलं जातं.

करिअरचा आलेख उंचावत असतानाच गोविंदा यांनी कलाविश्वातून काढता पाय घेतला आणि ते राजकारणाकडे वळाले.

गोविंदा यांनी अचानकपणे राजकारणात प्रवेश करायचा निर्णय घेतला.

गोविंदा यांनी राजकारणात प्रवेश घेतल्यानंतर त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परिणामी, त्यांच्या फिल्मी करिअरवर त्याचा परिणाम दिसू लागला.

गोविंदा राजकारणातही फार काळ टिकले नाहीत. त्यामुळे कलाविश्व सोडून राजकारणात जाण्याचा निर्णय त्यांचा चुकला असं आजही त्यांना वाटतं.