विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक, वादग्रस्त राहिलंय या अभिनेत्रीचं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 12:00 PM2023-05-04T12:00:47+5:302023-05-04T12:19:33+5:30

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे अधिक चर्चेत राहिली. यात तिच्या साखरपुडा मोडण्यापासून ते खासजी फोटो लीक होण्यापर्यंत आणि विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.

मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायवर तिच्या सौंदर्याची जादू अनेक वेळा पडली. ती अनेकदा तिच्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ करते. आम्ही बोलत आहोत 'पोन्नियिन सेल्वन 2' फेम त्रिशा कृष्णन बद्दल, जी सध्या चर्चेत आहे. आज त्रिशाचा वाढदिवस आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

4 मे 1983 रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या त्रिशाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्रिशा सध्या 'पोन्नियिन सेल्वन 2'मुळे चर्चेत आहे. तमिळ-तेलुगू चित्रपटांतून नाव कमावलेल्या त्रिशाने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनय कौशल्य दाखवले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

तृषाने तिच्या प्रोफेशन लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे अधिक चर्चेत राहिली. यात तिच्या साखरपुडा मोडण्यापासून ते खासजी फोटो लीक होण्यापर्यंत आणि विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

त्रिशाचे पहिले अफेअर विजयसोबत होते. 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'घिल्ली' चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या नात्याच्या अफवा पसरू लागल्या. त्यामुळे विजयचे वैवाहिक जीवन धोक्यात आले होते. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही.(फोटो इन्स्टाग्राम)

यानंतर त्रिशाचे नाव बाहुबली फेम राणा दग्गुबतीसोबत जोडले गेले. दोघेही अनेक वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. याचा खुलासा खुद्द राणा डग्गुबतीने कॉफी विथ करणमध्ये केला होता.

जेव्हा त्रिशा आणि राणा डग्गुबती रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा दोघांचे इंटिमेट फोटो लीक झाले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.

डिसेंबर 2015 मध्ये, त्रिशाने सर्वाना आश्चर्यचकित केले जेव्हा तिने वरुण मनियान या बिझनेसमनची साखरपुडा झाल्याची घोषणा केली. एंगेजमेंटमध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

मात्र, काही महिन्यात दोघांचा साखपुडा मोडला. धनुषमुळे त्रिशाची एंगेजमेंट तुटल्याचे बोलले जात आहे. धनुष एंगेजमेंटला आला तेव्हा धनुष आणि वरुणचे संबंध चांगले नव्हते. जेव्हा वरुणने हे समोर आणले तेव्हा त्रिशाचा संयम सुटला आणि यावरून दोघांमध्ये त्यांच्या एंगेजमेंट पार्टीत वाद झाला.

मात्र, काही महिन्यात दोघांचा साखपुडा मोडला. धनुषमुळे त्रिशाची एंगेजमेंट तुटल्याचे बोलले जात आहे. धनुष एंगेजमेंटला आला तेव्हा धनुष आणि वरुणचे संबंध चांगले नव्हते. जेव्हा वरुणने हे समोर आणले तेव्हा त्रिशाचा संयम सुटला आणि यावरून दोघांमध्ये त्यांच्या एंगेजमेंट पार्टीत वाद झाला.

नुकतीच त्रिशा 'पोनियिन सेल्वन 2' या चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)