वडील समोसे विकायचे... आज तीच नेहा कक्कर कमावते कोट्यवधी रुपये, जगतेय राजेशाही थाटात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 05:04 PM2023-06-06T17:04:12+5:302023-06-06T17:24:08+5:30

नेहाचे वडील एका कॉलेजबाहेर समोसे विकायचे. अत्यंत हालाखीच्या परिस्थिती नेहाचे बालपण गेले. वडिलांना हातभार लावण्यासाठी नेहा देवीच्या जागरणामध्ये भजनं गायची.

सध्या सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेली बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) हिचा आज वाढदिवस. आपल्या आवाजाने अक्षरश: वेड लावणारी नेहाचे आज लाखो-करोडो दिवाने आहेत. अर्थात इथपर्यंत पोहोचणे तिच्यासाठी सोपे नव्हते. (फोटो इन्स्टाग्राम)

नेहाचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. नेहाचे वडील एका कॉलेजबाहेर समोसे विकायचे. अत्यंत हालाखीच्या परिस्थिती नेहाचे बालपण गेले. (फोटो इन्स्टाग्राम)

वडिलांना हातभार लावण्यासाठी नेहा आणि तिची बहीण सोनू देवीच्या जागरणामध्ये भजनं गायच्या. यासाठी तिला केवळ 500 रुपये मिळायचे. (फोटो इन्स्टाग्राम)

caknowledge या वेबसाईटनुसार, नेहाची नेटवर्थ सुमारे 38 कोटी रूपये आहे. चित्रपटांमध्ये ती एका गाण्यासाठी 10-15 लाख रुपये घेते. (फोटो इन्स्टाग्राम)

तासाभराच्या शोसाठी ती 20 ते 25 लाख रुपये घेते. चॅरिटीसाठी विविध लाइव्ह कॉन्सर्ट शोमध्येही ती गायन करते. रिअ‍ॅलिटी शो सुद्धा जज करते. (फोटो इन्स्टाग्राम)

नेहा कधीकाळी मातेच्या जागरणात गायची. आज ती अलिशान आयुष्य जगते. नेहा मुंबईच्या वर्सोवा येथील 3 बीएचके अपार्टमेंटमध्ये राहते. हे एक सामान्य अपार्टमेंट नाही, याची किंमत अंदाजे 1.2 कोटी रुपये आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

याशिवाय अलीकडे तिने ऋषिकेशमध्येही बंगला खरेदी केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

लक्झरी आणि अलिशान गाड्यांमधून फिरणा-या नेहाकडे ऑडी क्यू 7 आहे जीची किंमत 70 लाख ते 1 कोटी रुपये आहे. नेहाकडे एक मर्सिडीज बेंझ जीएलएस 350 देखील आहे. तिची किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे. तिने स्वत: ला ही कार 2018 मध्ये भेट म्हणून दिली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

आज तिने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले असून आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची अनेक गाणी प्रचंड गाजली. (फोटो इन्स्टाग्राम)