बिपाशा बासू कमाईच्या बाबतीत पतीलाही देते टक्कर, सिनेमाच नाही तर या गोष्टीतूनही करते कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 04:05 PM2021-04-30T16:05:25+5:302021-04-30T16:13:03+5:30

हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय असते.

लग्नानंतर करण आणि बिपाशाचे नाते अधिक घट्ट झाले असून दोघांमध्येही खूप चांगली केमिस्ट्री आहे.

काही जण त्यांचं कौतुक करतात तर अनेकजण त्यांच्या लग्नावरून त्यांना ट्रोलही करतात.

विशेषतः तिसरं लग्न केल्याने करणसिंहला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं.

हे सगळं होत असताना अनेकांना करण सिंहच्या कमाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतो.

करणच्या तुलनेत बिपाशा लोकप्रियता,अभिनय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव अशा कित्येक गोष्टीत वरचढ आहे.

बिपाशा बासू कमाईच्या बातीत करण सिंहपेक्षा सात पटीने अधिक कमाई करते. वाचून थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

बिपाशा लग्नानंतर सिनेमात काम करत नसली तरी १०० कोटींची मालकीण आहे.

गेल्या काही वर्षांपासून बिपाशा सिनेमात झळकलेली नाही.असं असलं तरी तिचं कमाईचे साधन काय असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही.

अशात सिनेमावरच बिपाशाची कमाई अवलंबून नाही. जाहीरातींमधूनही ती बराच पैसा कमावते.

वेगेवेगळ्या ब्रँडमध्येही तिने गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तिला चांगले उत्पन्न मिळतं.