मराठमोळ्या अभिनेत्रीचा 'बिकिनी' लूक व्हायरल, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, "मार डाला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:57 IST2026-01-12T18:50:36+5:302026-01-12T18:57:59+5:30
अभिनेत्रीनं नवे फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

भूमीने नुकतेच तिच्या 'व्हॅकेशन'चे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये भूमीचा काळ्या रंगाच्या बिकिनी आणि कमरेभोवती बांधलेल्या सारोंगमधील 'बोल्ड' लूक चाहत्यांना अक्षरशः घायाळ करत आहे.

डोळ्यांवर सनग्लासेस आणि डोक्यावर मोठी हॅट घालून भूमी एखाद्या आयलंड क्वीनसारखी दिसत आहे.

भूमीचे हे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलंय, "मार डाला!" तर दुसऱ्याने लिहिलं, "तू हे कसं करतेस माहित नाही, पण तू साधे क्षणही खूप सुंदर बनवतेस".

भूमी पेडणेकरने पहिल्याच चित्रपटापासून प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. दम लगाकै हैशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भूमीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भूमीने नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे.

अभिनेत्रीने पाण्याच्या उद्योगात पाऊल ठेवले असून तिचा ब्रँड 'बॅकबे' प्रीमियम मिनरल वॉटर म्हणून बाजारात लोकप्रिय होत आहे.

लहान वयातच भूमीवरुन वडिलांचं छत्र हरपलं. भूमीचे वडील सतीश पेडणेकर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री होते.

















