भोजपुरीच्या ‘राणी’वर फिदा आहेत फॅन्स, फोटो पाहून व्हाल घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 16:18 IST2020-05-28T16:01:37+5:302020-05-28T16:18:57+5:30
भोजपुरी सिनेमात भोजपुरी अॅक्ट्रेस राणी चॅटर्जीची जबरदस्त क्रेज आहे.

राणी चॅटर्जी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे.
सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.
मुंबईमध्ये जन्मलेल्या राणीने फार कमी वयात अभिनय करण्यास सुरुवात केला होती.
ती केवळ 10 वीत असताना तिचा पहिला चित्रपट ‘ससुरा बडा पइसावाला’ रिलीज झाला होता.
अजय सिन्हा यांच्या या चित्रपटात राणीसोबत मनोज तिवारी मुख्य भूमिकेत होते. यावेळी राणी केवळ 16 वर्षांची होती.
त्यानंतर राणीने बंधन टूटे न, दामाद जी, सीता, देवरा बड़ा सतावेला, दिलजले यांसारख्या चित्रपटात काम केले.
राणी भोजपुरी चित्रपटातील जास्त मानधन घेणा-्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
मध्यंतरी राणीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते.
मी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा खुलासा तिने केला होता.
मात्र तिच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅनबद्दल तिने काहीही सांगितले नव्हते.