Avneet Kaur : "मी बॅट घेतली अन् त्याला धू धू धुतलं"; होळीच्या दिवशी गैरवर्तन होताच अभिनेत्रीचा रुद्रावतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:49 IST2025-03-22T12:45:45+5:302025-03-22T12:49:38+5:30

Avneet Kaur : अवनीतने खुलासा केला की, होळीच्या दिवशी एका मुलाने तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं होतं.

अवनीत कौर ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. अवनीतने बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिच्या फोटोंची नेहमीच जोरदार चर्चा रंगलेली असते.

अवनीतने अलीकडेच खुलासा केला की, होळीच्या दिवशी एका मुलाने तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं होतं. हॉटरफ्लायशी बोलताना अभिनेत्रीने तिच्या बालपणी होळीच्या वेळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला.

"होळीच्या वेळी मी एका मुलाला मला फुगा मारू नकोस असे सांगितलं, पण तरी त्याने रंगांनी मारलेला फुगा माझ्यावर फेकला. मला राग आला मी म्हटलं आता तू कामातून गेलास."

"तुला माहीत नाही की, मी किती धोकादायक मुलगी आहे. मी बॅट घेतली आणि त्याला मारहाण केली. धू धू धुतलं. मी मुलाला बॅटने मारल्यानंतर त्याची आई माझ्या आईकडे तक्रार करण्यासाठी आली."

"मुलाची आई माझ्या आईला म्हणाली की, तुमच्या मुलीने माझ्या मुलाला मारहाण केली आहे. यावर माझ्या आईन माझी बाजू घेतली आणि त्याने चुकीची गोष्ट केल्यामुळे मुलीने मारल्याचं म्हटलं" असं अवनीतने सांगितलं.

एका प्रसिद्ध साबण जाहिरातीच्या व्हिडिओमुळे शाळेत अभिनेत्रीची थट्टा करण्यात आली होती. अवनीतने सांगितलं की, जेव्हा जेव्हा ती शाळेच्या कॉरिडॉरमधून जायची तेव्हा मुलं "अरे, बंटी, तुझा साबण..." असं म्हणत चेष्टा करायचे.

"मी स्टार असल्याने लोक माझा दृष्टिकोन असाच समजत होते. मी अशीच आहे, पण लोकांना कोण सांगणार?" असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे.

अवनीत कौर लवकरच 'लव्ह इन व्हिएतनाम' आणि हॉलिवूड चित्रपट, टॉम क्रूझचा 'मिशन: इम्पॉसिबल - द फायनल रेकनिंग: पार्ट टू' मध्ये दिसणार आहे.