मलायका अरोरा एका प्रश्नावर लाजली! अर्जुन कपूरसोबतची बेडरुम सिक्रेट सांगूनच टाकली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 12:48 IST2022-12-13T12:32:03+5:302022-12-13T12:48:21+5:30
Malaika Arora- Arjun Kapoor: मलायका अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते.

'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरसोबत चॅट करताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सध्या या शोमधील काही भाग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मलायका अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते. लोक त्यांच्या वयाच्या अंतराबद्दल अनेकदा दोघांना ट्रोल करतात. मात्र या बिंधास्त मलायकाला काहीच फरक पडत नाही. करण जोहरने मलायकाला बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याबाबतही काही वैयक्तिक प्रश्न केले. या प्रश्नावर मलायकाचा चेहरा बघण्यासारखा होता.
करण जोहरने मलायकाला तिच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारला. तु आणि अर्जुन कपूर बेडरूममध्ये प्रयोग करतात का?, असं करण जोहरने विचारलं. करणचा हा प्रश्न ऐकून मलायकाचा चेहरा लाल झाला.
करण जोहरने मलायकाला तिची आवडती सेक्स पोझिशन कोणती?, असा सवालही विचारला. त्यावर अजिबात संकोच न करता तिने 'वुमन ऑन टॉप' असं उत्तर दिलं होत आणि या उत्तरानंतर दोघही एकमेकांकडे बघून हसू लागले होते.
मलायका काही वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करत होती. मात्र करण जोहरनेही हार मानली नाही. त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मलायकाकडून जाणून घेतली. तसेच सेक्स टॉय वापरते का?, असा सवालही करण जोहरने विचारला.
मलायका अरोराने या प्रश्नांची उत्तरे न देण्याचा निर्णय घेतला. करणचे बोलणे ऐकून ती खूप लाजताना दिसली. मलायकाकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने करण जोहरने त्याच्या सेक्स लाईफबद्दल सांगायला सुरुवात केली.
अरबाजसोबतच्या नात्यावर काय म्हणाली मलायका?
करण जोहर बॉलिवुडमध्ये गॉसिपसाठीही लोकप्रिय आहे. तसेच तो मलायकाचा चांगला मित्रही आहे. करणने मलायकाला अरबाजसोबत आता तिचे नाते कसे आहे अशा प्रश्न केला. यावर मलायका म्हणाली, 'आमच्यात अजुनही चांगले नाते आहे. पुर्वीपेक्षा आमचे सध्याचे नाते खुप चांगले आहे.
अर्जुन कपूरसोबत जवळीक-
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा २०१६ पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघंही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक आहेत ज्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुनच्या लग्नाबाबत अनेक अपडेटही समोर येत असतात. मलायका अरोरा आणि अरबाज यांच्या घटस्फोटानंतर तिची अर्जुन कपूरसोबतची जवळीक वाढू लागली. अनेक वर्षे डेट केल्यानंतर त्यांचे बंध आणखी घट्ट झाले आहेत.