१० सेकंदाच्या रोलसाठीही करावा लागला स्ट्रगल; आज तिच अर्चना पूरणसिंग आहे कोट्यवधींची मालकीन, नेटवर्थ ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 03:48 PM2022-01-09T15:48:25+5:302022-01-09T15:54:34+5:30

Archana puran singh: मड आयलंड येथे अर्चना पूरणसिंगचा आलिशान बंगला आहे. या बंगल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अर्चना पूरणसिंग यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. मात्र, कलाविश्वातील त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. केवळ १० सेकंदाचा रोल मिळावा यासाठीही त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला.

एकेकाळी संघर्ष करणारी ही अभिनेत्री आज कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यात ती प्रचंड लक्झरी लाइफ जगते.

आज लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत येणारी अर्चना एका कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचं मानधन घेतलं. त्यामुळेच अर्चना पूरणसिंगची एकूण संपत्ती किती ते पाहुयात.

मड आयलंड येथे अर्चना पूरणसिंगचा आलिशान बंगला आहे. या बंगल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अर्चना पूरणसिंग आज कोट्यवधींची मालकीन असून ती 'द कपिल शर्मा' शोसाठी १० लाख रुपये मानधन घेते.

सूत्रांच्या माहितीनुसार, अर्चनाचं नेटवर्थ 222.343 कोटी रुपये आहे.

अर्चनाने अभिनेता परमीत सेठीसोबत लग्न केलं असून ही जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

अर्चना पूरण सिंगला आर्यमन आणि आयुष्यमान ही दोन मुलं आहेत. परंतु, तिची दोन्ही मुलं स्टारडमपासून लांब आहेत. मात्र, कलाविश्वापासून दूर असूनही ते लक्झरी लाइफ जगतात.