बॉलिवूड सुंदरींनी दहावीत किती गुण मिळवले माहितेय? अनुष्का शर्माला पडले होते 'इतके' टक्के!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:03 IST2025-05-13T17:46:30+5:302025-05-13T18:03:34+5:30
बॉलिवूड अभिनेत्री शाळेत कशा होत्या? कोणी नापास, कोणी ९०% पेक्षा जास्त घेतले गुण!

आज १३ मे रोजी दहावी परीक्षेचा निकाल लागला आहे. कुणी चांगले गुण घेऊन पास झालंय. तर कुणी नापास झालंय. पण, लक्षात घ्या गुण म्हणजे गुणवत्ता नाही, आपल्याकडे वेगळी कला असेल, वेगळं काही करण्याची धमक असेल तर आपण आयुष्याच्या परीक्षेत नक्कीच टॉप करू शकतो.
कमी गुण मिळाल्यास खचून जाण्याची गरज नाही. बॉलिवूडमध्ये अशी अभिनेत्री आहे, जी दहावीमध्ये नापास झाली. ती अभिनेत्री आहे शिल्पा शिरोडकर. शिल्पा ही तिच्या डेब्यू चित्रपटाचं शुटिंग करत होती, तेव्हा तिच्या दहावीच्या परीक्षा सुरू होत्या. १९८९ मध्ये, तिने रेखा आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत 'भ्रष्टाचार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रमेश सिप्पी दिग्दर्शित या अॅक्शन ड्रामामध्ये शिल्पाने अंध मुलीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळाली आणि त्यानंतर तिला आणखी प्रोजेक्ट मिळाले. पण, शुटिंगच्या काळात अभ्यास करू न शकल्यानं ती नापास झाली होती. अभिनेत्री नापास झाली असली तरी ती आज बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तर काही अशाही आहेत, ज्यांनी चांगले गूण मिळवलेत. या यादीत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पहिल्या क्रमांकावर येते. तिची शैक्षणिक कामगिरी उल्लेखनीय होती. तिनं दहावीत ९३% मिळवले होते.
तर अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिनेदेखील दहावीच्या परीक्षेत ८४% गुण मिळवले होते.
यानंतर येते भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar). अभिनेत्रीला १० वीत ७८% गुण मिळाले होते.
क्रिती सनॉन (kriti Sonnen) हिने दहावीमध्ये ७२% गुण मिळवले होते.
बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) हिला दहावीच्या परीक्षेत ७१% मिळाले होते.
फिटनेस ऑयकॉन आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिशा पाटानीला (Disha Patani) दहावीच्या परीक्षेत ६४% गुण मिळाले होते.
मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिला दहावीला ७० टक्के गुण मिळवले होते.
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) कधीच शाळेत गेलेली नाही. तिचे शिक्षण घरीच गृहशिक्षकामार्फत झालं. तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यापारी होते, तर आई सुझैन ही ब्रिटिश आहे. कतरिनाचे बालपण जवळपास १८ देशांमध्ये गेले. यामुळेच ती कधी शाळेत गेली नाही आणि घरूनच शिकली. ब्रिटीश असल्याने तिचे इंग्रजी उत्तम आहे.