अंकिता लोखंडे अन् विकी जैनच्या लग्नाचा अल्बम आला समोर; पाहा Unseen photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 19:49 IST2022-03-03T19:45:55+5:302022-03-03T19:49:25+5:30
Ankita lokhande: अंकिताने लग्नानंतर तिच्या सासुरवाडीत झालेल्या काही विधींचे फोटो शेअर केले आहेत.

'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे.
अंकिता अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते.
अलिकडेच अंकिताने मर्सिडीज कार खरेदी केली आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.
अंकिताने काही महिन्यांपूर्वीच प्रियकर विकी जैनसोबत लग्न केलं. हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.
अंकिताने तिच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
यात आता पुन्हा एकदा अंकिताने तिच्या लग्नाचा अल्बम चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अंकिताने लग्नानंतर तिच्या सासुरवाडीत झालेल्या काही विधींचे फोटो शेअर केले आहेत.
अंकिता आणि विकी जैनने १४ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. तेव्हापासून अंकिता सातत्याने चर्चेत येत आहे.