'कुछ कुछ होता है'फेम छोटी अंजली आठवतेय? आता ३७ वर्षांची झाली अभिनेत्री; कशी दिसते पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:00 IST2026-04-04T11:43:50+5:302026-04-04T12:00:43+5:30

तीन वर्षांपूर्वीच केला साखरपुडा, लिव्ह इन मध्ये राहते अभिनेत्री, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड?

९० च्या दशकात आलेला तरुणाईचा लाडका चित्रपट 'कुछ कुछ होता है' आजही तितकाच लोकप्रिय आहे. सिनेमात शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यातलं लव्ह ट्रँगल दाखवण्यात आलं.

सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेतून लक्ष वेधून घेतलं होतं. सिनेमातील छोट्या अंजलीला तर कोणी विसरु शकत नाही. ती छोटी अंजली आता कशी दिसते पाहिलंत का?

'कुछ कुछ होता है'मध्ये छोट्या अंजलीची महत्वाची भूमिका होती. राहुल आणि अंजली यांची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी ही छोटी कसे प्रयत्न करते हे सिनेमात आपण पाहिलं.

अभिनेत्री सना सईदने छोट्या अंजलीची भूमिका साकारली होती. सना सईद आता ३७ वर्षांची आहे. सिनेमावेळी ती फक्त ८-९ वर्षांची होती.

अभिनेत्री सना सईदने छोट्या अंजलीची भूमिका साकारली होती. सना सईद आता ३७ वर्षांची आहे. सिनेमावेळी ती फक्त ८-९ वर्षांची होती.

सना आता एकदम हॉट अँड बोल्ड लूकमध्ये दिसते. ती लॉस एंजिलिस मध्ये स्थायिक झाली आहे. सोशल मीडियावर ती अनेक फोटो शेअर करते.

२०२३ मध्ये सनाने बॉयफ्रेंड csaba wagner सोबत साखरपुडा केला. तो हॉलीवूडमध्ये साउंड डिझायनर असून त्याची स्वत:ची कंपनी आहे.

नुकतेच त्यांच्या नात्याला तीन वर्ष झाली. तिने csaba सोबते फोटो शेअर करत 'तू आजही माझा सर्वात आवडता व्यक्ती आहेस आणि नेहमीच राहशील' असं लिहिलं आहे.

सनाला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नाही. करण जोहरच्याच 'स्टुडंट ऑफ द इयर'मध्ये ती दिसली होती. त्याआधी ती काही डान्स रिएलिटी शोमध्ये दिसली. मात्र तिला इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण करता आलं नाही.