Ananya Panday : "मी लग्न करेन", अनन्या पांडेला व्हायचंय सेटल; नवरा आणि मुलांबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:07 IST2025-01-08T17:54:25+5:302025-01-08T18:07:42+5:30
Ananya Panday : अनन्या पांडेने तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं आहे.

अनन्या पांडेने तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, तिला येत्या ५ वर्षांत स्वतःला लग्न झालेलं पाहायचं आहे.
अभिनेत्री म्हणाली की, तिला मुलं खूप आवडतात. तिला सेटल व्हायचं आहे. लहान मुलांव्यतिरिक्त तिला श्वान देखील खूप आवडतात.
एका मुलाखतीत अनन्या म्हणाली - येत्या ५ वर्षात मला आशा आहे की, मी लग्न करेन, एक आनंदी घर असेल, जिथे मी, मुलं आणि इतर गोष्टींसाठी प्लॅनिंग करेन.
सध्या तिचं लक्ष कामावर आहे. अभिनयात स्वत:ला आणखी सुधारण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. तिला स्वतःला टॉपवर पाहायचं आहे.
सध्या अनन्याचं नाव वॉकर ब्लँकोसोबत जोडलं जात आहे. दोघेही गुपचूप डेट करत असल्याची चर्चा आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दोघे एकत्र दिसले होते. अभिनेत्रीने वॉकरची तिचा पार्टनर म्हणून ओळख करून दिली होती.
रिपोर्टनुसार, वॉकर हा जामनगरमधील वंतारा येथे काम करतो. तो प्राणीप्रेमी आहे. अनन्यासोबतच्या नात्याबाबत त्याने मौन पाळलं आहे.
चांद मेरा दिल है हा अनन्याचा आगामी चित्रपट यामध्ये ती लक्ष्यसोबत दिसणार आहे. कॉल मी बे आणि कंट्रोल या सीरिजच्या यशामुळे ती खूश आहे.