अनन्या पांडेची बहिण अलाना पांडेने शेअर केले बॉयफ्रेंडसोबत होळी खेळतानाचे फोटो, फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:29 PM2021-04-03T14:29:53+5:302021-04-03T14:29:53+5:30

ट्रॅव्हल ब्लॉगर आणि फॅशन डिझायनर अलाना पांडेने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत अलाना पांडे तिचा बॉयफ्रेंड इवोर मैकरेसोबत होळी सेलिब्रेट करताना दिसते आहे.

अलाना पांडे सोशल मीडियावर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अलाना पांडे चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी कोणती संधी सोडत नाही.

अलाना अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण आहे आणि चंकी पांडेची भाची आहे.

सध्या अलाना बॉयफ्रेंड इवोर मैकरेसोबक अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहत आहे.

अलाना चिक्की पांडे आणि स्कॉटिश फिटनेस ट्रेनर डिएना पांडेची मुलगी आहे.

अलानाचे इंस्टाग्रामवर ६ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.