Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती, शेअर केले फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:03 IST2025-05-23T11:45:14+5:302025-05-23T12:03:24+5:30
अमृता यांच्या कान्समधील उपस्थितीनं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सिनेविश्वातील मानाचा मानला जाणारा कान्स चित्रपट महोत्सव (2025 Cannes Film Festival) १३ मे पासून सुरू झाला आहे. हा ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव येत्या २४ मे २०२५ पर्यंत चालणार आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) यांनीदेखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आहे.
अमृता यांच्या कान्समधील उपस्थितीनं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यासोबत त्यांचा लूकही खूप चर्चेत आहे.
अमृता यांनी कान्समध्ये युनेस्को आणि बेटर वर्ल्ड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'महिलांची समानता' या महत्त्वपूर्ण विषयावरील चर्चासत्रात सहभाग घेतला होता.
या चर्चासत्रात अमृता फडणवीस यांनी जागतिक स्तरावर महिलांच्या हक्कांसाठी आणि समान संधीसाठी आपले विचार मांडले.
या चर्चासत्रातील विशेष बाब म्हणजे, अमृता फडणवीस यांनी एक सामाजिक जबाबदारी आनंदाने स्वीकारली आहे. त्या आता 'Ambassador for Women’s Rights' म्हणून काम पाहणार आहेत.
या नव्या भूमिकेतून त्या जगभरातील महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणार असून, त्यांच्यासाठी कार्य करणार आहेत.
अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
अमृता फडणवीस या बँकर असण्यासोबतच त्या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी अनेक गाणी आपल्या आवाजात संगीतबद्ध केली असून ती युट्युबवर उपलब्ध आहेत.
अमृता फडणवीस नेहमीच त्यांच्या बिनधास्त वागण्यासाठी, तसेच स्पष्ट बोलण्यावरुन अनेकदा चर्चेचा विषय बनतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे १.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.