बिचारे बिग बी! जया बच्चन यांच्या मैत्रिणी अमिताभ यांना 'या' नावाने चिडवायच्या, वाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:54 IST2025-05-15T16:35:55+5:302025-05-15T16:54:52+5:30

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन लवकरच त्यांच्या लग्नाचा ५२ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यानिमित्त वाचा हा खास किस्सा

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात आदर्श कपल म्हणून ओळखलं जातं. गेली अनेक वर्श जया-अमिताभ यांचा एकमेकांसोबत सुखी संसार सुरु आहे

जया - अमिताभ बच्चन अनेक इव्हेट्समध्ये एकत्र दिसतात. अमिताभ यांना जया बच्चन यांच्या मैत्रिणी एका खास नावाने चिडवायच्या

झालं असं की, जया बच्चन त्यावेळी पुण्यातील FTII मध्ये शिकत होत्या. अमिताभ त्यांच्या 'सात हिंदुस्तानी' सिनेमाच्या शूटिंगसाठी पुण्यात यायचे.

अमिताभ यांची उंची आणि त्यांचा आवाज या गोष्टींचं आज जरी कौतुक होत असलं तरी सुरुवातीला याच गोष्टींमुळे बिग बींना टीकाही सहन करावी लागले

बिग बींना त्यांच्या उंचीमुळे जया बच्चन यांच्या मैत्रिणी 'लंबू लंबू' करुन चिडवायच्या. जया यांच्या मैत्रिणीच असल्याने बिचारे बिग बी हे चिडवणं सहन करायचे

बिग बी आणि जया बच्चन यांनी पहिल्यांदा 'गुड्डी' या सिनेमात एकत्र काम केलं. 'गुड्डी' सिनेमातूनच जया बच्चन यांनी बॉलिवूड पदार्पण केलं

येत्या जून महिन्यात जया बच्चन आणि अमिताभ बच्चन त्यांच्या लग्नाचा ५२ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. दोघांनी इतक्या वर्षांमध्ये एकमेकांची साथ कधीही सोडली नाही