लाल साडीत सुंदर दिसत होत्या जया बच्चन, पाहा अमिताभ यांच्या लग्नातील Unseen फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:51 IST2025-06-03T16:25:57+5:302025-06-03T16:51:37+5:30
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. अमिताभ-जया यांच्या लग्नाला ५२ पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत.
३ जून १९७३ रोजी अमिताभ आणि जया लग्नबंधनात अडकले होते. आज या जोडीवर चाहत्यांनी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रेमाचा वर्षाव केलाय.
आजही चाहते जया आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
जया यांनी लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती. अगदी मिनिमल मेकअपमध्ये त्या अतिशय सुंदर दिसत होत्या.
हे लग्न त्या काळातील हाय प्रोफाइल लग्नांपैकी एक मानले जात होतं.
या फोटोमध्ये अमिताभ यांचे वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन देखील त्यांच्या मागे बसल्याचे दिसत आहे.
जया यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होतं की त्या पहिल्याच नजरेत अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या होत्या. दोघेही 'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते.
फक्त खऱ्या आयुष्यात नाही तर त्यांची जोडी पडद्यावरही हिट ठरली आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
अमिताभ यांनी जया बच्चनसोबत पहिला हिट चित्रपट दिला. 'जंजीर' चित्रपटात दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन गेल्या ५२ वर्षांपासून एकमेकांना साथ देत आले आहेत. दोघांनी या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले, परंतु कधीही एकमेकांना सोडलं नाही.