अंबानींच्या गणेशोत्सवाला बॉलिवूडकरांची मांदियाळी, सनी देओल कुठे दिसलाच नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 03:31 PM2023-09-20T15:31:06+5:302023-09-20T15:41:54+5:30

सनी देओलचं अंबानी कुटुंबासोबत खास कनेक्शन आहे. तरी...

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. गणरायाचं अगदी थाटामाटात आणि जल्लोषात आगमन झालं आहे. सेलिब्रिटींच्या घरीही गणराय विराजमान झाले असून सर्व एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पाचा आशिर्वाद घेत आहेत. काल रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया येथील घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडची मांदियाळी दिसली.

अंबानींच्या अँटिलिया येथील घरी काल रात्री अख्खं बॉलिवूड अवतरलं. शाहरुख खान पूर्ण कुटुंबासोबत आला होता. पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना आणि मुलगा अबराम सर्वच पारंपारिक वेशात आले. यावेळी आर्यन खान मात्र दिसला नाही.

दुसरीकडे सलमान खानने भाची अलीजेहसोबत एंट्री घेतली. भाईजान नेहमीप्रमाणेच डॅशिंग अंदाजात दिसला तर अलीजेह खूपच सुंदर दिसत होती.

ऐश्वर्या राय बच्चन लेक आराध्याला घेऊन आली होती. ऐश्वर्या आणि आराध्याने पंजाबी लुक कॅरी केला होता. बच्चन कुटुंबियांकडून फक्त या दोघींनीच हजेरी लावली.

अंबानींच्या गणेशोत्सवासाठी हेमा मालिनी यांनी धाकटी लेक आहानासोबत आल्या होत्या. त्यांनी लाल रंगाची साडी परिधान केली होती ज्यात त्या नेहमीसारख्याच ड्रीमगर्ल दिसल्या.

यावेळी 'गदर 2'ला मिळालेलं यश एन्जॉय करणारा सनी देओल मात्र दिसला नाही. सनी आणि अंबानी कुटुंब यांच्यात खास कनेक्शन आहे. सनी स्वत: एक व्यावसायिक असून त्याने शेअर बाजारात अंबानींच्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.

सनी देओल खासदारही आहे. २०१९ साली सनीने निवडणूकीसाठी संपत्तीचा तपशील जमा केला होता. यानुसार त्याचे मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये १६० शेयर आहेत. याची किंमत २ लाख १२ हजार रुपये आहे.

एवढं खास कनेक्शन असतानाही सनी दिसला नाही म्हणल्यावर सर्वांनाच प्रश्न पडला. तर याचं कारण असं की सनी देओल सध्या मुंबईत नसून वडील धर्मेंद्र यांच्यासोबत अमेरिकेत आहे. तो तिथे वडिलांसोबत सुट्ट्या एन्जॉय करतोय. याच कारणाने त्याला गणेशोत्सवाला येता आलं नाही.