Photos: आलिया भटचा कान्समध्ये रेट्रो लूक, फ्रेंच रिवेराजवळ केलं ग्लॅमरस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:13 IST2025-05-26T16:01:51+5:302025-05-26T16:13:55+5:30
आलिया भटच्या ग्लॅमरस फोटोंवर खिळल्या नजरा, तुम्ही पाहिलेत का?

अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt) कायम तिच्या फॅशनने सर्वांना प्रभावित करते. आपल्या स्टाईलने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या दिमाखात भारताचं प्रतिनिधित्व करते.
नुकत्याच झालेल्या ७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवात आलियाने आपली जादू दाखवली. यंदा आलियाने कान्समध्ये पदार्पण केलं आणि नेहमीप्रमाणेच इथेही ती चमकली.
दरम्यान एका लूकमध्ये आलियाने रेट्रो लूक कॅरी केला होता. 'गुची' ब्रँडची स्टाईल तिने केली आहे. पिवळ्या रंगाचा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप, त्याच रंगाचा स्कर्ट आणि मॅचिंग जॅकेट तिने परिधान केलं आहे.
यावर तिने मॅचिंग क्युट असा स्कार्फही बांधला आहे. डोळ्यावर ब्लॅक गॉगल आहे. हातात ब्रँडेड पर्स आहे. ओठांवर भडकल लाल रंगाची लिपस्टीक लावली आहे जी तिला शोभून दिसतेय.
आलिया या लूकमध्ये एकदम स्टायलिश अंदाजात दिसत आहे. फ्रेंच रिव्हेराजवळ तिने हे फोटोशूट केलं आहे. या लूकमधून तिने चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकवला आहे.
आलिया भटचा हा परदेशी लूक चांगलाच पसंत केला जातोय. या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'सनशाईन','स्टनिंग' अशा कमेंट्स तिच्या या फोटोंवर आल्या आहेत.