फारच गोड आहे अक्षय कुमारची लाडकी लेक, तिचं नाव काय? पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:18 IST2025-09-26T17:57:13+5:302025-09-26T18:18:19+5:30

अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी ९० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. अक्षय आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी दोन मुलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव आरव कुमार असं असून मुलीचं नाव नितारा कुमार असं आहे.

अक्षय कायम मुलीला पापाराझींपासून दूर ठेवतो. पण, जेव्हा नितारा हिची एक झलक दिसते, तेव्हा तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी निताराच्या भोवती गर्दी करतात.

अलिकडेच २५ सप्टेंबरला निताराचा वाढदिवस झाला. अक्षय कुमारची मुलगी नितारा ही १२ वर्षांची आहे, तिचा जन्म २५ सप्टेंबर २०१२ रोजी झाला होता.

नितारा तिच्या वडिलांची म्हणजेच अक्षय कुमारची 'कार्बन कॉपी' आहे असे अनेक चाहते म्हणतात.

नितारा क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसते. पण जेव्हा जेव्हा ती दिसते, तेव्हा तिच्या गोंडसपणाने ती सर्वांचे मन जिंकते.

अक्षयचा मोठा मुलगा आरवदेखील माध्यमांपासून दूर राहतो. आरवचा जन्म २००२ मध्ये झाला होता.

दरम्यान, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा विवाह १७ जानेवारी २००१ रोजी झाला होता. दोघांच्या लग्नाला आज २४ वर्षे ८ महिने पुर्ण झाले आहेत.