ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डचा पगार किती? तगडं आहे वार्षिक पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:42 IST2025-03-30T12:21:08+5:302025-03-30T12:42:23+5:30
ऐश्वर्या बॉडीगार्डला किती पगार देते, ते जाणून घेऊयात.

बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan ) ही कायमच चर्चेत असते.
अलिकडेच तिच्याकारला बेस्ट बसने मागून धडक दिल्याची घटना मुंबईत घडली होती. या अपघातामध्ये कुणीही जखमी झालं नाही. ऐश्वर्याच्या लक्झरी कारचंही किरकोळ नुकसान झालं.
मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेनंतर बच्चन कुटुंबीयांच्या बॉडीगार्डने बस ड्रायव्हरच्या कानाखाली मारल्याचा प्रकार घडला. बस ड्रायव्हरने पोलिसांना कॉल करत हा घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं काम पाहणाऱ्या सुपरव्हायझरने त्या बस ड्रायव्हरची माफी मागितली. त्यानंतर हे प्रकरण मिटलं.
पण, यातच आता सावलीप्रमाणे ऐश्वर्याच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे तिचे बॉडीगार्ड चर्चेत आले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार ऐश्वर्या रायची सुरक्षा दोन बॉडिगार्ड पाहतात. एकाच नाव शिवराज तर दुसऱ्याचं नाव राजेंद्र ढोले असं आहे.
ऐश्वर्या जसं तगडं मानधन घेते तसं तिचे बॉडीगार्डही कोटींचं मानधन घेतात. बॉडीगार्डला ऐश्वर्या राय किती पगार देते ते जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिवराजचा पगार महिन्याला सात लाख रुपये इतका आहे. ऐश्वर्याचा दुसरा बॉडीगार्ड राजेंद्र ढोले हादेखील अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्याचा वर्षाचा पगार एक कोटी असल्याची माहिती आहे.
ऐश्वर्याचे बॉडीगार्ड हे तिच्याबरोबर चित्रपटांच्या सेटवर, ट्रिपदरम्यान सगळीकडे हजर असतात. ऐश्वर्याबरोबरचा त्याचा बॉण्डदेखील उत्तम असल्याचे पाहायला मिळते.
आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐश्वर्या प्रसिद्ध आहे. १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करणारी ऐश्वर्या अगदी लक्झरीस आयुष्य जगते.
ऐश्वर्या रायच्या कमाईचा आकडा पाहून तर भल्या भल्यांना देखील भुरळ येईल. ऐश्वर्या ही ८५० कोटींची मालकिन आहे.